
Chile Earthquake : साउथ अमेरिकेतील चिली येथील एंटोफगास्टा परिसरात 6.2 रिश्टर स्केलच्या भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. युरोपीय-मेडिटेरेनियन सिस्मॉजॉलिकल सेंटर (EMSC) यांच्याकडून भूकंपाची पुष्टी करण्यात आली आहे. याबद्दल माहिती देताना ईएमएसएसी यांनी म्हटले की, भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीपासून 104 किलोमीटर खोलवर होता. सध्या भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर कोणतेही नुकसान न झाल्याचे वृत्त आहे.
भूकंपाचे जोरदार धक्के जाणवल्यानंतर स्थानिक अधिकाऱ्यांकडून स्थितीवर लक्ष ठेवले जात आहे. याशिवाय नागरिकांना सतर्क आणि सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, अद्याप कोणतेही मोठे नुकसान झालेले नाही. पण असे मानले जातेय की, आणखी काही भूकंपाचे धक्के जाणवले जाऊ शकतात.
चिलीमध्ये यापूर्वीही अनेकदा तीव्र भूकंप झाले आहेत. येथील विशेतज्ज्ञांनुसार, या भूकंपाच्या धक्कानंतर आणखी काही धक्के बसू शकतात. यामुळे सरकार आणि आपत्ती व्यवस्थापन संस्था अॅलर्ट झाल्या आहेत.
चिलीमध्ये यापूर्वी वाल्डिविया येथे आलेल्या भूकंपाची तीव्रता 9.5 रिश्टर स्केल होती. या भूकंपात तब्बल 1655 जणांचा मृत्यू झाला होता. याशिवाय 3 हजार नागरिक जखमी झाले होते. वर्ष 2010 मध्ये चिलीत आलेल्या भूकंपात 300 हून अधिक जणांचा मृत्यू झाला होता. या भूकंपाची तीव्रता 8.8 रिश्टर स्केल होती.
आणखी वाचा :
पाकिस्तानी वराने हेलिकॉप्टरने सासरीवर पैशांचा पाऊस पाडला
तालिबानचा महिलांवरील निर्बंध: खिडक्या बंद करण्याचे आदेश