क्रूरतेची पार केली हद्द: बांगलादेशी खासदाराला कोलकाता येथील फ्लॅटवर बोलावून केला खून, अक्षरशः अंगावरची कातडीही काढली

बांगलादेशी खासदाराची अक्षरशः हत्या करण्याची एक घटना समोर आली आहे. बांगलादेशी खासदार अन्वारुल अझीम अनार यांच्या हत्येचा कट त्यांच्या मित्रानेच रचला होता आणि त्यांना हनी ट्रॅपच्या  मदतीने येथे बोलावण्यात आले होते. 

vivek panmand | Published : May 24, 2024 11:18 AM IST / Updated: May 24 2024, 04:49 PM IST

कोलकातामध्ये बांगलादेशी खासदाराची हत्या झाल्याची भीषण घटना समोर आली आहे. बांगलादेशी खासदार हनी ट्रॅपमध्ये अडकले आणि त्यांचा जीव घेण्यात आला. बांगलादेशी खासदाराच्या हत्येचा कट रचणारी व्यक्तीही त्याच्या ओळखीची व्यक्ती होती. खासदार अन्वारुल अजीम अनार यांची त्यांच्याच मित्राने हत्या केली आहे.

कोलकाता फ्लॅटमध्ये मृतदेह सापडला, कातडीही काढली
बांगलादेशी खासदाराला फ्लॅटवर बोलावून त्यांची हत्या करण्यात आली. खून करून मृतदेहाचे तुकडे केले. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मारेकऱ्यांनी मृतदेहाचे तुकडे केले आणि त्याची कातडीही काढली. खासदाराची हत्या करण्यासाठी मारेकऱ्याने हनीट्रॅपची मदत घेतली. बांगलादेशी खासदाराला कोलकाता येथे बोलावून त्यांची हत्या करण्याचे कारण सध्या स्पष्ट झालेले नाही.

खासदाराला मित्रानेच फसवले - 
बांगलादेशी खासदार अन्वारुल अझीम अनार यांच्या हत्येचा कट त्यांच्या मित्रानेच रचला होता. अन्वारुलला कोलकात्यातील न्यूटाऊन भागातील एका तरुणीने बोलावले होते. अनारचा मित्र अख्तर रझमान शाहीनने त्याची एका मुलीशी ओळख करून दिली होती. यानंतर हत्येचा कट रचण्यात आला. आरोपीला बांगलादेशातून अटक करण्यात आली आहे.

हत्येप्रकरणी आतापर्यंत तिघांना अटक
बांगलादेशचे खासदार अन्वारुल अझीम अनार यांच्या हत्येप्रकरणी आतापर्यंत तीन जणांना अटक करण्यात आली आहे. पश्चिम बंगाल सीआयडीने एकाला अटक केली आहे. ही व्यक्ती हत्येपूर्वी मारेकऱ्यांना भेटली होती. तो बांगलादेश सीमेजवळ राहतो.

पाच कोटींची सुपारी लागल्याची चर्चा
बांगलादेशचे खासदार अनार यांच्या हत्येच्या बदल्यात 5 कोटी रुपयांची सुपारी घेतल्याचे सांगितले जात आहे. हत्येचा कट रचण्यामागचे कारण अद्याप समोर आलेले नाही. 
आणखी वाचा - 
राज्याची परिस्थिती बिकट पण सरकार लक्ष देत नाही, शरद पवार यांनी दुष्काळाच्या मुद्यावरून सरकारवर केली टीका
तो येवल्यावाला म्हणतो की आम्ही एकत्र 60 टक्के आहोत, मनोज जरांगे यांनी छगन भुजबळ यांच्यावर केली टीका

Share this article