ॲपल फोन बनवणाऱ्या फॉक्सकॉकची भारतात एवढ्या कोटींची गुंतवणूक

Published : May 20, 2025, 09:17 AM ISTUpdated : May 20, 2025, 09:39 AM IST
Apple logo

सार

Apple Investment In India : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फॉक्सकॉकने भारतात गुंतवणूक करू नये असा सल्ला दिला होता. त्याएवजी अमेरिकेत त्यांचे उत्पादन वाढवावे असे म्हटले होते.

Apple Investment In India : अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर आयात शुल्कावरून टीका करत Appleने अमेरिकेतच उत्पादन वाढवावे, अशी मागणी केली असतानाच Appleच्या भागीदार कंपनी फॉक्सकॉनने भारतात तब्बल १२,८०० कोटी रुपयांची गुंतवणूक करून ट्रम्प यांच्या भूमिकेला अप्रत्यक्ष उत्तर दिले आहे.

भारतात ५ दिवसांत मोठी गुंतवणूक १४ मे ते १९ मे दरम्यान फॉक्सकॉनने सिंगापूरमधील त्यांच्या युनिटमार्फत तामिळनाडूतील "युजान टेक्नॉलॉजी (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड" मध्ये १.४८ अब्ज डॉलर (सुमारे १२,८०० कोटी रुपये) इतकी गुंतवणूक केली आहे. ही माहिती कंपनीने शेअर बाजाराला दिली आहे.

Appleचा फोकस भारतावर, अमेरिका-चीनवरील अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न Appleचे CEO टिम कुक यांनी स्पष्ट केले आहे की, जून तिमाहीत अमेरिकेत विकले जाणारे बहुतेक iPhones भारतात तयार झालेले असतील. यामुळे अमेरिकन बाजारासाठी चीनवरील अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. चीनमधील करधोरणातील अनिश्चितता, वाढते शुल्क आणि व्यापार तणावामुळे Appleने भारताकडे वळण्याचा निर्णय घेतला आहे.

सध्या भारतात फॉक्सकॉन, टाटा इलेक्ट्रॉनिक्स आणि पेगाट्रॉन इंडिया या कंपन्या iPhone उत्पादनात गुंतलेल्या आहेत. विशेषतः टाटा इलेक्ट्रॉनिक्स लवकरच iPhone असेंब्लीचा मुख्य भागीदार बनण्याच्या तयारीत आहे.

ट्रम्प यांची टीका, पण वास्तव वेगळे ट्रम्प यांनी अलीकडेच म्हटले की, "भारत हा सर्वाधिक शुल्क आकारणाऱ्या देशांपैकी एक आहे, आणि Appleने अमेरिकेतच उत्पादन वाढवावे." मात्र तज्ज्ञांच्या मते, ही मागणी आर्थिकदृष्ट्या शक्य नाही. अमेरिकेत iPhone बनवल्यास त्याची किंमत $1000 वरून $3000 पर्यंत जाऊ शकते, जी ग्राहकांना परवडणारी नाही.

भारतातील गुंतवणूक सुरूच राहणार Apple व त्याचे भारतातील भागीदार देशात उत्पादन क्षमतावाढीसाठी सतत गुंतवणूक करत आहेत. केंद्र सरकारनेही अमेरिकन उत्पादनांवरील शुल्कात सवलतीचा प्रस्ताव दिला आहे, ज्यामुळे भारत-अमेरिका व्यापारी संबंध आणखी मजबूत होण्याची शक्यता आहे.

अहवालानुसार, २०२५ च्या अखेरीपर्यंत Apple अमेरिकेसाठी सर्व iPhones ची असेंब्ली भारतात हलवू शकतो. Appleने यापूर्वीच भारतात स्थानिक उत्पादन वाढवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Japan Earthquake : जपानमध्ये 7.6 रिश्टर स्केलचा भूकंप, त्सुनामीचा इशारा, उंच लाटांची भीती
पाकिस्तानच्या संसदेत खरंच गाढव शिरला? व्हायरल व्हिडिओमागील सत्य आले समोर