
आपण पाणी गरम करण्यासाठी घरावर सोलर पॅनल लावत असतो हे तुम्हाला माहित आहे, पण छतावर सोलर लावून आपण वीजनिर्मितीची कधी कल्पना केली आहे का? तर आपण छतावर सोलर लावून वीज निर्मिती करून घरातील लाईट बील शून्यावर आणू शकता याची तुम्हाला कल्पना नसेल. पण हे खरंच आपण सहजपणे करू शकता.
‘पीएम सूर्य घर: मोफत बिजली योजना’ या योजनेच्या माध्यमातून आपण घरावर सोलर पॅनल बसवू शकता आणि लाईटने संपूर्ण घर प्रकाशमान करू शकता. आपण याच योजनेबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. याच ध्येयाचा भाग म्हणून, 13 फेब्रुवारी 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘पीएम सूर्य घर: मोफत बिजली योजना’ या महत्त्वाकांक्षी योजनेची घोषणा केली.
सरकारचे उद्दिष्ट हे एक कोटी घरांना दरमहा ३०० युनिटपर्यंत मोफत वीज देण्याचं सरकारच उद्दिष्ट आहे. ही योजना खासकरून सामान्य नागरिकांसाठी असून त्याचा फायदा काही स्टेप्स फॉलो करून घेता येणार आहे. सूर्यप्रकाशाचा फायदा घेऊन आपण सोलर पॅनल बसवू शकता आणि त्यामाध्यमातून घरात वीज आणू शकता.
सदर योजनेचे फायदे आणि लाभ सर्वात आधी आपल्याला माहित असायला हवेत. या योजनेसाठी सरकारकडून मोठ्या प्रमाणावर सबसिडी दिली जाते. आपल्याला किती क्षमतेचे सोलर बसवायचे आहे त्यावर किती सबसिडी दिली जाईल हे समजून घेता येईल. 1 ते 2 kW क्षमतेसाठी: ₹30,000 ते ₹60,000 पर्यंत सबसिडी. 2 ते 3 kW क्षमतेसाठी: ₹60,000 ते ₹78,000 पर्यंत सबसिडी. 3 kW पेक्षा जास्त क्षमतेसाठी: कमाल ₹78,000 ची सबसिडी मिळते.
आपण २ ते ३ किलोवॅटचे सोलर बसवल्यास ३०० युनिटपर्यंतच्या विजेचा आपल्याला फायदा मिळवता येणार आहे. त्यामुळे आपल्याला घरात शून्य वीज बील येईल. महिन्याच्या शेवटी बजेट बसवताना लाईट बील न आल्यास आपल्या पैशांची बचत व्हायला मदत मिळणार आहे. आपण अतिरिक्त वीज बनवल्यास ती सहजपणे विजेच्या कंपनीला सहजपणे विकू शकता.
हा अर्ज आपण सहज सोप्या पद्धतीने करू शकता. pmsuryaghar.gov.in या वेबसाईटवर जाऊन आपण सर्वात आधी नोंदणी करून घ्या. त्यानंतर लॉग इन करून संपूर्ण माहिती भरून घ्या. तांत्रिक मंजुरीची वाट पाहून पॅनल बसवून घ्या. नोंदणीकृत विक्रेत्याकडून पॅनल बसवल्यास आपल्याला सरकारकडून सबसिडी मिळू शकते. त्यामुळं विक्रेता हा नोंदणीकृत आहे का हे तपासून पहा.