इगो दुखावल्यामुळे..
पण, हे पूर्णपणे प्रेमच आहे असं समजणं चुकीचं आहे. कधीकधी आपण त्या व्यक्तीला नाही, तर त्या व्यक्तीसोबत असताना 'आपल्याला मिळणाऱ्या भावनेला' मिस करत असतो. म्हणजे, त्यांच्याकडून मिळणारं महत्त्व, प्रेम मिळत असल्याची भावना यांसारख्या गोष्टी. मानसशास्त्रानुसार, ब्रेकअपनंतर आपल्या आत्मसन्मानाला धक्का बसण्याची शक्यता असते. 'मी कमी पडलो/पडले का?', 'मला का सोडून दिलं?' हे प्रश्न इगो दुखावून जातात. त्यामुळेही काहीजण एक्सला विसरू शकत नाहीत.