TV Shape: टीव्ही कोणत्या आकाराचे असतात? हा काय प्रश्न झाला का? तुम्ही कोणताही टीव्ही आयताकृती आकारातच असतो, असं तुम्ही म्हणाल. पण टीव्ही याच आकारात का असतात, याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? त्याबद्दल जाणून घ्या…
टीव्ही आपल्या दैनंदिन जीवनाचा एक भाग बनला आहे. बातम्या, चित्रपट, मालिका, खेळ... सर्व काही आपण टीव्हीवर पाहतो. पण तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली आहे का? टीव्हीचा आकार नेहमी आयताकृती असतो. तो गोलाकार किंवा त्रिकोणी का नसतो? याची काही स्पष्ट कारणे आहेत.
25
टीव्ही कंटेंटसाठी योग्य असा आकार
टीव्हीवर प्रसारित होणारे व्हिडिओ एका विशिष्ट गुणोत्तरात बनवले जातात. सध्या सर्वाधिक वापरले जाणारे गुणोत्तर 16:9 आहे. हे गुणोत्तर आयताकृती स्क्रीनसाठी अगदी योग्य आहे. चित्रपट, टीव्ही शो, न्यूज चॅनल हे सर्व याच फॉरमॅटमध्ये तयार केले जातात. टीव्हीचा आकार बदलल्यास व्हिडिओ पूर्णपणे दिसणार नाही.
35
16:9 हे गुणोत्तर कसे आले?
1950 ते 1980 च्या दशकात टीव्हीसाठी 4:3 गुणोत्तर वापरले जात होते. तेव्हाचा कंटेंटही त्याच प्रकारे तयार केला जात असे. नंतर तंत्रज्ञान बदलले. स्क्रीन मोठी झाली. घरातच सिनेमाचा अनुभव मिळावा या उद्देशाने 16:9 हे गुणोत्तर आणले गेले. तेव्हापासून आजपर्यंत टीव्हीचा आकार कितीही वाढला तरी हे गुणोत्तर बदललेले नाही.
गोलाकार किंवा त्रिकोणी आकार असता तर काय झाले असते?
टीव्ही गोलाकार किंवा त्रिकोणी असता, तर कंटेंट अर्धा कापला गेला असता. व्हिडिओचे कोपरे दिसले नसते. ते पाहण्यासाठी गैरसोयीचे ठरले असते. 1950 च्या दशकात CRT टीव्ही बाहेरून गोलाकार दिसत असले तरी, आतला डिस्प्ले आयताकृतीच होता. तंत्रज्ञानाच्या विकासामुळे बाहेरील स्क्रीनदेखील आयताकृती झाली.
55
आपल्या मेंदूला सरावलेला आकार
आपल्या सभोवतालच्या फोटो फ्रेम, मोबाईल स्क्रीन, लॅपटॉप, खिडक्या... या सर्व गोष्टी बहुतेक आयताकृती असतात. आपल्या मेंदूलाही या आकाराची सवय झाली आहे. LCD, LED तंत्रज्ञान आल्यानंतर या आकारात स्क्रीन बनवणे सोपे झाले. ते कमी जागा घेते आणि डोळ्यांना त्रास होत नाही. म्हणूनच टीव्हीसाठी हा आकार निश्चित झाला आहे.