आज स्मार्टफोनपासून लॅपटॉपपर्यंत आणि टीव्हीपासून स्मार्ट होमपर्यंत सगळंच वायफायवर चालतं. वायफाय आपल्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग बनलंय. पण हे तंत्रज्ञान कोणी शोधलं? डॉ. जॉन ओ'सुलिव्हन या ऑस्ट्रेलियन शास्त्रज्ञ आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरने यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी एकट्याने हा शोध लावला नाही. त्यांच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाच्या CSIRO (कॉमनवेल्थ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च ऑर्गनायझेशन) मधील पाच शास्त्रज्ञांच्या टीमने हे तंत्रज्ञान विकसित केलं. या टीममध्ये टेरी पर्सिव्हल, डायथेलम ओस्ट्री, ग्रॅहम डॅनियल्स आणि जॉन डीन यांचाही समावेश होता.
24
वायफाय म्हणजे नक्की काय?
वायफाय म्हणजे वायरशिवाय रेडिओ लहरींच्या (Radio waves) मदतीने इंटरनेट आणि उपकरणांना जोडणारं तंत्रज्ञान. अनेकांना वाटतं की वायफाय म्हणजे 'Wireless Fidelity'. पण तज्ज्ञांच्या मते याला कोणताही अधिकृत फुल फॉर्म नाही. 'Hi-Fi' (High Fidelity) या शब्दाशी साधर्म्य सांगण्यासाठी मार्केटिंगच्या उद्देशाने हे नाव दिलं गेलं. १९७० च्या दशकात जॉन ओ'सुलिव्हन रेडिओ खगोलशास्त्रावर संशोधन करत होते. अवकाशातून येणाऱ्या रेडिओ लहरींचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी फास्ट फुरिअर ट्रान्सफॉर्म (FFT) हे तंत्रज्ञान विकसित केलं. याच तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांनी १९९२ मध्ये वायफायचं पेटंट दाखल केलं. १९९३ मध्ये प्रोटोटाइप बनवला आणि १९९६ मध्ये अमेरिकेत पेटंट मिळवलं.
34
जग बदलणारा शोध
डॉ. जॉन ओ'सुलिव्हन यांनी एका क्षेत्रातील संशोधनाचा वापर दुसऱ्या क्षेत्रात करून जग बदलणारा शोध लावला. अंतराळ संशोधनासाठी बनवलेलं सिग्नल प्रोसेसिंग तंत्रज्ञान त्यांनी कॉम्प्युटर नेटवर्किंगमध्ये वापरलं. या महान शोधासाठी २००९ मध्ये त्यांना ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांचा विज्ञान पुरस्कार मिळाला. तसेच, २०१२ मध्ये त्यांच्या संपूर्ण टीमला युरोपियन इन्व्हेंटर अवॉर्डने सन्मानित करण्यात आलं.
वायफाय तंत्रज्ञानामुळे इंटरनेटच्या वापरात मोठी क्रांती आली. एकेकाळी फक्त कॉम्प्युटरपुरतं मर्यादित असलेलं हे तंत्रज्ञान आता स्मार्टफोन, टीव्ही, कॅमेरे आणि गेमिंग कन्सोलपर्यंत पोहोचलंय. आज जगभरातील कोट्यवधी लोक वायफाय वापरतात. वर्क फ्रॉम होम, ऑनलाइन शिक्षण आणि व्हिडिओ कॉल्स यासाठी वायफाय खूप महत्त्वाचं ठरतंय. अवकाशातील रेडिओ लहरींचा अभ्यास करण्यासाठी सुरू झालेलं हे संशोधन आज संपूर्ण जगाला वायरशिवाय जोडत आहे.
Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .