ही स्पेशल ऑफर मिळवण्यासाठी पात्र ग्राहकांना 8219582195 या नंबरवर मिस्ड कॉल द्यावा लागेल. नवीन ग्राहकांनी दोन महिन्यांचा JioHome प्लॅन घेतल्यास त्यांना एक महिन्याची अतिरिक्त सर्व्हिस फ्री दिली जातेय. जिओ होम सर्व्हिसमध्ये १५ भाषांमधील १,००० हून अधिक डिजिटल टीव्ही चॅनेल्स पाहण्याची सुविधा आहे. यासोबतच अनेक OTT अॅप्स आणि अनलिमिटेड हाय-स्पीड वायफायची सुविधाही मिळते.
जिओच्या माहितीनुसार, ग्राहक कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय JioTV+ अॅपद्वारे एकाच जिओ सेट-टॉप बॉक्सचा वापर करून घरातील दोन स्मार्ट टीव्हीवर कार्यक्रम पाहू शकतात. वार्षिक प्लॅन निवडल्यास जिओ होम इन्स्टॉलेशन फ्री केलं जाईल. या सेटअपमध्ये वायफाय राउटर, 4K टीव्ही सेट-टॉप बॉक्स आणि आउटडोअर डिव्हाइस मिळेल. नुकतंच जिओने फक्त १५ रुपयांचा एक नवीन रिचार्ज पॅकही लाँच केलाय. या पॅकमध्ये २४ तासांसाठी अनलिमिटेड 5G इंटरनेट सुविधा मिळते.
दुसरीकडे, जिओ आपल्या वर्धापन दिनानिमित्त आणखी एक खास ऑफर देत आहे. फक्त १,४९९ रुपयांना नवीन जिओ भारत (JioBharat) कीपॅड फोन खरेदी केल्यास, त्यासोबत ६ महिन्यांचा रिचार्ज फ्री मिळेल. या ऑफरमध्ये JioBharat A1, B1, B2 आणि B3 सिरीजच्या फोन्सचा समावेश आहे. फ्री रिचार्जमध्ये दर महिन्याला 14GB डेटा (रोज 0.5GB) आणि अनलिमिटेड HD कॉलिंगची सुविधा मिळेल. यासोबतच ५०० हून अधिक लाईव्ह टीव्ही चॅनेल्स, JioPay, JioSaavn, JioHotstar, सेफ्टी फर्स्ट फीचर आणि २३ भारतीय भाषांचा सपोर्टही या फोन्समध्ये मिळतोय.