PM Kisan Yojana: या योजनेचा हप्ता कधी मिळणार, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Published : May 10, 2026, 10:46 AM IST

पीएम किसान योजनेच्या २३व्या हप्त्याची शेतकरी वाट पाहत आहेत. केवायसी पूर्ण नसणे किंवा बँक खात्याशी आधार लिंक नसणे यांसारख्या चुकांमुळे हप्ता थांबू शकतो, त्यामुळे शेतकऱ्यांनी ही कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत.

PREV
16
PM Kisan Yojana: या योजनेचा हप्ता कधी मिळणार, जाणून घ्या संपूर्ण माहिती

पीएम किसान योजनेचा पुढचा हप्ता कधी येणार याकडं सर्व शेतकऱ्यांचे डोळे लागून राहिले आहेत. आता येणारा २३वा हप्ता शेतकऱ्यांना मिळणार का आणि तो हप्ता कधीपर्यंत जमा होईल हा सर्वांना प्रश्न पडला आहे.

26
हप्ता नाही थांबणार

आता हा जमा होणारा हप्ता थांबणार नाही असं सांगण्यात आलं आहे. काही शेतकऱ्यांनी केवायसी केलेली नसेल तर त्यांचे पैसे थांबवले जातात आणि त्यामुळं त्यांच्या खात्यात हा हप्ता जमा होत नाही.

36
मागचा हप्ता का जमा झाला नाही

मागचा हप्ता का जमा झाला नाही हा प्रश्न अनेकांच्या मनात पडणं स्वाभाविक आहे. त्यामुळं आपण कोणत्या चुका केलेल्या आहेत आणि त्या आपण कशा प्रकारे टाळू शकतो याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत.

46
KYC पूर्ण करून घ्या

आपण जर आपल्या खात्याची KYC केलेली नसेल तर ती सर्वात आधी पूर्ण करून घ्या. त्यानंतर आपल्या खात्यात पैसे जमा होतील. त्यामुळं आपल्या २३वा हप्ता जमा होणार नाही.

56
आधार लिंकची अडचण

आधार लिंकची अडचण आली असल्यास आपल्या खात्यात पैसे जमा होणार नाही. आपले बँक खाते हे आधार कार्डशी जोडलेले आहे का हे सर्वात आधी तपासून घ्या.

66
एकदाच दोन हप्ते मिळणार का?

आपल्या खात्यावर एकदाच दोन हप्ते मिळणार का या प्रश्नाचं उत्तर आपल्याला लवकरच मिळणार आहे. आपण सर्वात आधी आपल्या फोनमधील डेटा व्यवस्थित भरला आहे का हे तपासून घ्या.

Read more Photos on

Recommended Stories