WhatsApp Nano Banana : आता व्हॉट्सॲपवर थेट ट्रेंडिंग नॅनो बनाना इमेज तयार करता येणार. यासाठी वेगळ्या ॲपची गरज नाही! हे व्हायरल फीचर कसे वापरायचे ते जाणून घ्या.
गूगल जेमिनीच्या नॅनो बनानासारखे ट्रेंडिंग फोटो आता थेट व्हॉट्सॲपवर बनवता येणार आहेत. Perplexity AI ने हे नवीन फीचर आणले आहे, जे सोपे आणि वेगवान आहे.
24
व्हॉट्सॲपवर नॅनो बनाना इमेज बनवण्याचं सीक्रेट
Perplexity AI चे CEO अरविंद श्रीनिवास यांनी याची पुष्टी केली आहे. युजर्स आता व्हॉट्सॲपवर थेट AI इमेज एडिट आणि तयार करू शकतात. रेट्रो पोर्ट्रेट आणि व्हायरल साडी ट्रेंडिंग इमेज बनवता येतील.
34
व्हॉट्सॲपवर इमेज कशा तयार करायच्या?
फोटो बनवण्यासाठी, गूगल AI किंवा जेमिनी ॲपची गरज नाही. फक्त +1 (833) 436-3285 या नंबरवर मेसेज करा, फोटो अपलोड करा आणि तुम्हाला हवी असलेली स्टाईल सांगा. काही सेकंदात इमेज तयार होईल.
हे फीचर मोफत असेल की नाही हे Perplexity ने स्पष्ट केलेले नाही. सध्या जेमिनीवर हे मोफत आहे, पण व्हॉट्सॲपवर नंतर शुल्क आकारले जाऊ शकते. हा एक लोकप्रिय AI इमेज ट्रेंड बनला आहे.