लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना घ्या काळजी, अन्यथा होऊ शकते फसवणूक

Published : Sep 24, 2025, 11:15 AM IST

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी e-KYC करणे अनिवार्य आहे. मात्र, अनेक बनावट वेबसाइट्सद्वारे फसवणूक होत असल्याने, सरकारने केवळ अधिकृत वेबसाइट (ladakibahin.maharashtra.gov.in) वापरण्याचा सल्ला दिला आहे. 

PREV
16
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना घ्या काळजी, अन्यथा होऊ शकते फसवणूक

लाडकी बहीण योजनेत केवायसी करताना काळजी घ्यायला हवी. आपण चुकीच्या वेबसाईटवर जाऊन माहिती भरल्यास आपलं बँक खाते रिकामे होण्याची शक्यता आहे.

26
लाडकी बहीण योजनेत e-KYC करणे बंधनकारक

लाडकी बहीण योजनेत e-KYC करणे बंधनकारक करण्यात आलं आहे. महिलांना दर महिन्याला मिळणारी १५०० रुपयांची मदत मिळवण्यासाठी दोन महिन्यांमध्ये e-KYC करणे बंधनकारक करण्यात आलं आहे.

36
e-KYC करताना फसवणूक होण्याची शक्यता

आपण e-KYC करत असाल तर आपली फसवणूक होण्याची दाट शक्यता आहे. अशावेळी बनावट वेबसाईट्सपासून सावध राहावे असं सरकारच्या वतीने सांगण्यात आलं आहे.

46
बनावट वेबसाईट्सपासून सावध राहा

बनावट वेबसाईट्सपासून सावध राहण्याची सूचना देण्यात आली आहे. गूगलवर 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' सर्च केल्यास काही बनावट वेबसाइट्स समोर येत आहेत. त्यामुळं आपण काळजी घेणं आवश्यक आहे.

56
कोणत्या आहेत बनावट वेबसाईट्स?

'hubcomut.in' अशा नावाच्या काही बनावट वेबसाईट्सवर केवायसी करू नये अन्यथा आपली फसवणूक होण्याची दाट शक्यता आहे. जर तुम्ही चुकून या बनावट वेबसाइटवर तुमची माहिती दिली, तर तुमच्या बँक खात्याची माहिती चुकीच्या व्यक्तींच्या हातात जाऊ शकते.

66
बँक खाते होऊ शकते रिकामे

आपण बनावट वेबसाईट्सवर जाऊन नोंदणी केल्यास आपलं बँक खाते रिकामे होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. फसवणुकीपासून वाचण्यासाठी, ई-केवायसी फक्त सरकारच्या अधिकृत वेबसाइटवरच करावी. यासाठी सरकारने ladakibahin.maharashtra.gov.in ही अधिकृत वेबसाइट जाहीर केली आहे.

Read more Photos on

Recommended Stories