Heart Attack Signs: हार्ट अटॅक येण्यापूर्वी शरीर देतं हे 6 संकेत, कधीच दुर्लक्ष करू नका

vivek panmand   | CMS
Published : Nov 23, 2026, 06:06 PM IST
heart attack

सार

heart attack: आजकाल तरुणांमध्येही हार्ट अटॅकचे प्रमाण खूप वाढले आहे आणि यात अचानक जीव जाण्याचा धोका असतो.

बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकदा हृदयाच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. हार्ट अटॅक येण्यापूर्वी आपलं शरीर काही पूर्वसंकेत देतं, ते कोणते आहेत ते जाणून घेऊया.

1. छातीत दुखणे

हार्ट अटॅकचं हे सर्वात मुख्य लक्षण आहे. छातीच्या मध्यभागी किंवा डाव्या बाजूला दुखत असेल तर त्याला अजिबात हलक्यात घेऊ नका.

2. श्वास घेण्यास त्रास होणे

श्वास घ्यायला त्रास होत असेल किंवा खूप दम लागत असेल, तर हे सुद्धा हार्ट अटॅकचे संकेत असू शकतात.

3. जास्त घाम येणे

विनाकारण खूप जास्त घाम येणे हेही हार्ट अटॅकचे लक्षण असू शकते. अचानक खूप घाम आल्यास सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.

4. पायांवर सूज

पायांवर सूज येणे, मळमळ किंवा उलटी होणे, आणि छातीत जळजळ होणे हे देखील हार्ट अटॅकचे पूर्वसंकेत असू शकतात.

5. चिंता आणि भीती

खूप जास्त चिंता वाटणे, विनाकारण भीती वाटणे यांसारखी भावनिक लक्षणं सुद्धा काही वेळा हार्ट अटॅकपूर्वी दिसू शकतात.

6. थकवा आणि चक्कर येणे

कोणतेही कष्टाचे काम न करता खूप थकवा जाणवणे किंवा चक्कर येणे हेही हृदयविकाराच्या झटक्याचे संकेत असू शकतात.

टीप: वर दिलेली लक्षणं दिसल्यास स्वतःच आजाराचं निदान करू नका. अशा वेळी तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या. डॉक्टरांच्या तपासणीनंतरच आजाराची खात्री करा.

PREV
Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .
Read more Articles on

Recommended Stories

Savings Schemes : कमी धोका, जास्त नफा... 8.20% व्याज देणाऱ्या सरकारी बचत योजना
Smart TV Cleaning : स्मार्ट टीव्हीची स्क्रीन कशी साफ करायची?