Vitamin D Deficiency : सूर्यप्रकाश आपल्या त्वचेवर पडल्यावर अनेक रासायनिक प्रक्रिया होतात, ज्यामुळे शरीरात व्हिटॅमिन डी तयार होते. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात. विशेषतः महिलांनी याची काळजी घेणे आवश्यक आहे.
व्हिटॅमिन डीची कमतरता; महिलांनी दुर्लक्ष करू नये अशी लक्षणे
व्हिटॅमिन डी कमी झाल्यास शरीर कोणती लक्षणे दाखवते, ते जाणून घेऊया. ही लक्षणे अगदी सामन्य आहेत. त्यामुळे आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. पण तसे करु नका. नाहीतर भविष्यात मोठ्या धोक्याला सामोरे जावे लागू शकते. चला जाणून घेऊयात.
210
मूड स्विंग्स
डिप्रेशन, चिंता, मूड स्विंग्स यांसारख्या समस्या व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे होऊ शकतात. त्यामुळे आता बरे वाटत होते, पण क्षणात वेगळे वाटू लागले, असे होते. लगेच वागणूक बदलते.
310
केस गळणे
व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे काही लोकांमध्ये केसगळतीची समस्या देखील उद्भवू शकते. त्यामुळे घरी ठिकठिकाणी केस दिसून येतील. ही सामान्य केसगळतीची समस्या असल्याचे समजू नका.
त्वचेला खाज सुटणे, त्वचा पाहून वय जास्त वाटणे यांसारख्या समस्या व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे होऊ शकतात. कोरडी त्वचा राहत असेल तर डॉक्टरांशी संपर्क साधा. अनेक समस्यांवर उपाय शोधा.
510
कोरडी त्वचा
व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे त्वचा कोरडी होण्याची शक्यता असते. कोरडी त्वचा रखरखीत वाटते. तिला खाजही सुटते. त्यामुळे लगेच डॉक्टरांकडे जा. उशीर करु नका. किंवा अंगावर काढू नका.
610
अति थकवा
पुरेशी विश्रांती घेऊनही येणारा थकवा आणि अशक्तपणा हे व्हिटॅमिन डीच्या कमतरतेचे लक्षण असू शकते. त्यामुळे कायम थकल्या थकल्या सारखे वाटते. विश्रांती घेतल्यावरही फ्रेश वाटत नाही.
710
रोगप्रतिकारशक्ती कमी होणे
सतत शिंका, सर्दी आणि ताप येणे हे कमी रोगप्रतिकारशक्तीचे लक्षण आहे. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होऊ शकते. त्यामुळे सामान्य आजारही लगेच जडतात. त्यावर औधोपचार करावा लागतो. त्यामुळे वेळीच याकडे लक्ष द्या.
810
स्नायू कमकुवत होणे
हाडे आणि स्नायूंमध्ये वेदना, स्नायूंची कमजोरी, हात-पाय दुखणे, दातदुखी, कंबरदुखी ही व्हिटॅमिन डीच्या कमतरतेची लक्षणे आहेत. शरीर दुखणे म्हणजे शरीरात काहीतरी कमी आहे, असे समजा.
910
जखम बरी होण्यास वेळ लागणे
जखम बरी होण्यास वेळ लागणे हे देखील व्हिटॅमिन डीच्या कमतरतेचे एक लक्षण आहे. जखमी झाली तरी ती लगेच भरुन निघत नाही. त्यावर औषध लावावे लागत असेल तर अलर्ट व्हा.
1010
लक्षात ठेवा:
वर नमूद केलेली लक्षणे दिसल्यास, स्वतः निदान न करता डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. घरीच उपचार करण्याचा प्रयत्न करु नका. तज्ज्ञ व्यक्तीला सांगा. त्याच्याकडून उपचार करुन घ्या.