Men Fertility : आजच्या आधुनिक जीवनशैलीमुळे पुरुषांमध्ये वंध्यत्वाची समस्या वाढत आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, पुरुषांनी त्यांच्या शुक्राणूंची गुणवत्ता आणि संख्या टिकवून ठेवण्यासाठी काही पदार्थांपासून दूर राहावे.
आजकाल तरुण पिढी मुलांच्या नियोजनाबद्दल खूप विचार करते. लग्नानंतर तीन-चार वर्षे कुटुंब वाढवण्याचा विचार करत नाहीत. नंतर मूल होण्यासाठी अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. आधुनिक जीवनशैलीमुळे पुरुषांमध्येही वंध्यत्वाची समस्या दिसून येत आहे.
27
पुरुष आणि आहार
लग्नानंतर पुरुषांमध्ये अनेक समस्या दिसू शकतात. या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी पुरुषांनी काही पदार्थांपासून दूर राहावे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, पुरुषांनी काही पदार्थ खाणे टाळले पाहिजे. ते पदार्थ कोणते आहेत, याची माहिती येथे दिली आहे.
37
ट्रान्स फॅट्स
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, पुरुषांनी ट्रान्स फॅट असलेले पदार्थ टाळावेत. हे पदार्थ आरोग्यासाठी हानिकारक मानले जातात. ट्रान्स फॅटमुळे पुरुषांच्या शुक्राणूंची गुणवत्ता कमी होते. एका स्पॅनिश अभ्यासानुसार, यामुळे हृदयरोगचा धोकाही वाढतो.
कोणत्याही प्रकारचे प्रक्रिया केलेले मांस खाल्ल्याने पुरुषांमधील शुक्राणूंची संख्या कमी होते. त्यामुळे प्रक्रिया केलेल्या मांसापासून बनवलेले पदार्थ खाऊ नयेत, असे आरोग्य तज्ज्ञ सांगतात.
57
सोया पदार्थ
सोया पदार्थांमध्ये फायटोएस्ट्रोजेन्सचे प्रमाण जास्त असते. फायटोएस्ट्रोजेन्सच्या अतिसेवनाने शरीरातील हार्मोनल संतुलन बिघडते. एका ताज्या अभ्यासानुसार, यामुळे शुक्राणूंची संख्या कमी होऊ शकते.
67
जास्त फॅट असलेले दुग्धजन्य पदार्थ
जास्त फॅट असलेले दुग्धजन्य पदार्थ पुरुषांच्या शुक्राणूंची संख्या कमी करतात, असे काही अहवालांमधून समोर आले आहे. एका अभ्यासानुसार, पूर्ण फॅट दूध, क्रीम आणि चीजच्या सेवनाने शुक्राणूंची गुणवत्ता कमी होण्याची शक्यता असते.
77
'अति तेथे माती'
'अति तेथे माती' या म्हणीप्रमाणे, आरोग्यदायी पदार्थही प्रमाणात खाणे महत्त्वाचे आहे. निरोगी जीवन जगण्यासाठी योग्य पदार्थांची निवड करणे खूप आवश्यक आहे.