Luxury EV: VinFast ची नवी 'लाख'मोलाची गाडी, फीचर्स पाहून व्हाल थक्क!

Published : Mar 04, 2026, 08:53 PM IST
Luxury EV

सार

Luxury EV व्हिएतनामची प्रसिद्ध कार कंपनी विनफास्टने (VinFast) आपल्या 'लॅक हाँग' (Lac Hong) या लक्झरी ब्रँडअंतर्गत 800S आणि 900S ही दोन नवीन अल्ट्रा-लक्झरी मॉडेल्स सादर केली आहेत. ही दोन्ही मॉडेल्स 2027 मध्ये बाजारात दाखल होतील.

Luxury EV व्हिएतनामची आघाडीची कार उत्पादक कंपनी विनफास्टने (VinFast) ऑटोमोबाईल विश्वात मोठी घोषणा केली आहे. कंपनीने आपल्या 'लॅक हाँग' (Lac Hong) या फ्लॅगशिप ब्रँडखाली दोन नवीन अल्ट्रा-लक्झरी मॉडेल्स सादर केली आहेत. 800S आणि 900S असं या गाड्यांचं नाव आहे. कंपनीच्या सध्याच्या 900 LX या फ्लॅगशिप मॉडेलसोबत आता ही नवी मॉडेल्स लक्झरी सेगमेंटमध्ये कंपनीची पकड आणखी मजबूत करतील. यातील 800S ही एक प्रीमियम एसयूव्ही (SUV) आहे, तर 900S ही अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेली एक लक्झरी सेडान (Sedan) आहे. ही दोन्ही मॉडेल्स 2027 मध्ये बाजारात येतील, अशी माहिती विनफास्टने दिली आहे.

या दोन्ही गाड्यांमध्ये प्रवाशांच्या आरामासाठी जबरदस्त सुविधा देण्यात आल्या आहेत. झिरो-ग्रॅव्हिटी एक्झिक्युटिव्ह सीट्स, आपोआप उघडणारे आणि बंद होणारे दरवाजे (Automatic Power Assisted Doors) आणि प्रीमियम एंटरटेनमेंट सिस्टीम यांसारखी फीचर्स स्टँडर्ड म्हणून देण्यात आली आहेत. 900S मॉडेलमध्ये तर यापेक्षाही खास गोष्टी आहेत. मागच्या सीटवर बसलेल्या प्रवाशांसाठी प्रायव्हसी देणारं पार्टिशन, प्रोजेक्शनवर आधारित एंटरटेनमेंट सिस्टीम आणि फोल्ड करता येण्याजोगं एक्झिक्युटिव्ह वर्कस्टेशन हे या गाडीचे मुख्य हायलाइट्स आहेत. गाडीच्या केबिनमध्ये नप्पा लेदर, दुर्मिळ लाकूड आणि सोन्याचा मुलामा दिलेले सजावटीचे घटक मोठ्या प्रमाणात वापरण्यात आले आहेत.

डिझाइनच्या बाबतीतही लॅक हाँग मॉडेल्स खूपच आकर्षक आहेत. गाडीच्या पुढच्या ग्रीलवर व्हिएतनामी बांबूपासून प्रेरित होऊन उभ्या पट्ट्यांची रचना केली आहे. 'लॅक' नावाच्या पक्षावरून प्रेरणा घेऊन पंखांच्या आकाराचा एम्ब्लेम तयार करण्यात आला आहे. 'लॅक हाँग' हे नाव हस्तलिखित फॉन्टमध्ये, खऱ्या सोन्याचा मुलामा दिलेल्या अलॉयने कोरण्यात आलं आहे.

या दोन्ही गाड्यांमध्ये ट्रिपल-मोटर सेटअप देण्यात आला आहे. यात एक मोटर पुढे आणि दोन मोटर्स मागे आहेत. ही सिस्टीम एकूण 616 BHP पर्यंतची जबरदस्त पॉवर निर्माण करते. यासोबतच, गाडीत ॲक्टिव्ह सस्पेन्शन सिस्टीमचाही समावेश आहे.

याचबरोबर, विनफास्टने आपल्या ब्रँड स्ट्रक्चरमध्ये बदल केल्याचीही घोषणा केली आहे. 'लॅक हाँग' ही कंपनीची फ्लॅगशिप म्हणजेच सर्वात महागडी सीरिज असेल. 'VF' सीरिजमध्ये सामान्य ग्राहकांसाठी इलेक्ट्रिक पॅसेंजर गाड्या असतील. तर 'ग्रीन' ब्रँड खास करून व्यावसायिक आणि सर्व्हिस मोबिलिटीसाठी काम करेल. या नव्या रणनीतीमुळे जागतिक बाजारपेठेत विनफास्टचं स्थान आणखी मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Astrology: राहूचे 'या' राशींशी असते वैर; राजाला करते रंक, तुमची रास यात आहे का?
The Psychology: शांत राहणारे लोक खरंच मनाने स्ट्राँग असतात? काय आहे वास्तव?