
UPI Payment Without Internet : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) ८ डिसेंबर, २०२३ पासून रुग्णालय आणि शिक्षण संस्थांमध्ये पेमेंटसाठी युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) पेमेंटची मर्यादा वाढवली आहे. ही मर्यादा एक लाखांवरून पाच लाखांपर्यंत करण्यात आली आहे. कर्ज, म्युच्युअल फंड आणि क्रेडिट कार्डच्या बिलांच्या पेमेंटची मर्यादाही वाढवली आहे.
शाळा आणि रुग्णालयांमध्ये पेमेंटसाठी रांगा लागतात. पण आता RBIच्या नव्या नियमानुसार, तुम्ही UPI द्वारे पाच लाखांपर्यंत पेमेंट करू शकता. हे पेमेंट इंटरनेटशिवायही करता येते. याची सोपी ट्रिक जाणून घेऊया....
UPI द्वारे पेमेंट
इंटरनेटशिवाय पेमेंटसाठी *99#IFSCcode वापरा आणि डेबिट कार्डवरील शेवटचे सहा अंक टाकून Ok वर क्लिक करा. तुमच्या मोबाइलवर पेमेंटसाठी मेसेज येईल. मग तुम्ही पेमेंट करू शकता.
UPIच्या नव्या मर्यादेचे फायदे
UPIच्या नव्या मर्यादेमुळे रुग्णालयाची बिले, शिक्षण संस्थांचे शुल्क आणि इतर आर्थिक व्यवहार सोपे होतील. डिजिटल पेमेंटला चालना मिळेल. मोठ्या रकमेचे व्यवहार UPI द्वारे करणे सोपे होईल.