
प्लॅटफॉर्म तिकीट: अनेकजण ट्रेनने प्रवास करतात, तर काही नातेवाईकांना सोडण्यासाठी किंवा घेण्यासाठी स्थानकावर येतात. त्यावेळी प्लॅटफॉर्म तिकीट आवश्यक असते. पण प्लॅटफॉर्म तिकिटाची वैधता किती आणि जास्त वेळ थांबल्यास दंड होतो का, हे जाणून घेऊया.
रेल्वे स्थानकात एखाद्याला सोडण्यासाठी किंवा घेण्यासाठी जाताना प्लॅटफॉर्म तिकीट लागते. आता हे तिकीट ऑनलाईनही मिळते. युटीएस अॅप (UTS App) डाउलोड करून, नोंदणी करून, स्थानक निवडून तिकीट काढता येते. तिकिटावर स्थानकाचे नाव, वैधता आणि वेळ असते. मोठ्या स्थानकांवर ही वैधता साधारणतः दोन तासांची असते. ऑनलाईन तिकीट रद्द करता येत नाही.
ट्रेन उशिरा आल्यास
ट्रेन उशिरा आल्यास, आधीच काढलेले प्लॅटफॉर्म तिकीट स्थानकात पोहोचल्यावर अवैध होऊ शकते. त्यामुळे तिकीट काढण्यापूर्वी ट्रेनचा लाइव्ह स्टेटस (Train Live Status) पहा.
दोन तासांपेक्षा जास्त वेळ थांबल्यास
प्लॅटफॉर्म तिकिटावर दोन तास स्थानकात राहता येते. जास्त वेळ थांबल्यास तिकीट तपासनीस (Ticket Collector) दंड आकारू शकतो. दंडासोबत जवळच्या स्थानकापर्यंतचे भाडेही भरावे लागू शकते.
प्लॅटफॉर्म तिकिटावर प्रवास करता येतो का?
रिजर्व्हेशन नसल्यास, प्लॅटफॉर्म तिकिटावर ट्रेनमध्ये चढता येते. तिकीट तपासनीस (TTE) कडे जाऊन प्रवासाचे तिकीट घ्यावे लागते. हे तिकीट तिकीट तपासनीस दाखवता येते.