Upcoming Hybrid SUVs: भारतीय रस्त्यांवर धुमाकूळ घालायला येतायत या हायब्रिड कार्स!

vivek panmand   | CMS
Published : Oct 04, 2026, 06:05 PM IST
Upcoming Hybrid SUVs: भारतीय रस्त्यांवर धुमाकूळ घालायला येतायत या हायब्रिड कार्स!

सार

भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये आता कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये हायब्रिड टेक्नॉलॉजीची एन्ट्री होत आहे. मारुती सुझुकी फ्रॉन्क्स, किया सोनेट, होंडाची नवीन एसयूव्ही आणि टोयोटा अर्बन क्रूझर यांसारख्या गाड्या लवकरच हायब्रिड व्हर्जनमध्ये पाहायला मिळतील. यामुळे मार्केटमध्ये मोठा बदल होणार आहे.

भारतात हायब्रिड कार्सची डिमांड हळूहळू वाढतेय. सध्या टोयोटा हायरायडर, मारुती सुझुकी ग्रँड विटारा आणि इन्व्हिक्टो यांसारख्या मोठ्या आणि महागड्या गाड्यांमध्येच हायब्रिड टेक्नॉलॉजी मिळते. पण आता चित्र बदलणार आहे. अनेक कार कंपन्या आता कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्येही स्ट्रॉंग हायब्रिड टेक्नॉलॉजी आणण्याच्या तयारीत आहेत. येत्या काही वर्षांत या सेगमेंटमध्ये अनेक हायब्रिड मॉडेल्स रस्त्यावर धावताना दिसतील. काही मॉडेल्सची कंपन्यांनी पुष्टी केलीय, तर काहींबद्दल फक्त रिपोर्ट्स समोर आलेत.

मारुती सुझुकी फ्रॉन्क्स हायब्रिड

मारुती सुझुकीची स्वतःची स्ट्रॉंग हायब्रिड टेक्नॉलॉजी मिळवणारी फ्रॉन्क्स ही पहिली सब-4 मीटर एसयूव्ही ठरू शकते. कंपनी सध्या या टेक्नॉलॉजीची टेस्टिंग करत असल्याचं समजतंय. नवीन 1.2 लिटर झेड-सिरीज 3-सिलेंडर पेट्रोल इंजिनसोबत इलेक्ट्रिक मोटर आणि बॅटरी पॅक असं या हायब्रिड सिस्टीमचं स्वरूप असेल. सध्याच्या फ्रॉन्क्समधील माईल्ड हायब्रिड सिस्टीमपेक्षा ही वेगळी असेल. या स्ट्रॉंग हायब्रिड सिस्टीममुळे गाडी काही अंतरापर्यंत पूर्णपणे इलेक्ट्रिक पॉवरवर धावू शकेल. फ्रॉन्क्सच्या नेक्स्ट-जनरेशन अपडेटसोबत ही नवीन हायब्रिड सिस्टीम लाँच होण्याची शक्यता आहे.

किया सोनेट हायब्रिड

कियाची लोकप्रिय कॉम्पॅक्ट एसयूव्ही सोनेटचं नेक्स्ट-जनरेशन मॉडेल 2027 मध्ये भारतात येण्याची अपेक्षा आहे. नवीन सोनेट कंपनीच्या नवीन K1 प्लॅटफॉर्मवर तयार केली जाईल. पण यातला सर्वात मोठा बदल म्हणजे याचं हायब्रिड पॉवरट्रेन. भारतात सोनेटमध्ये हायब्रिड टेक्नॉलॉजी आणण्याचा प्लॅन असल्याचं कियाने आधीच कन्फर्म केलंय. 2028 किंवा 2029 पर्यंत ही टेक्नॉलॉजी लाँच होऊ शकते. इंजिन, इलेक्ट्रिक मोटर आणि बॅटरीबद्दल कंपनीने अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. नेक्स्ट-जनरेशन सोनेट लाँच झाल्यानंतरच तिचं हायब्रिड व्हर्जन मार्केटमध्ये येईल, असे रिपोर्ट्स आहेत.

होंडाची नवीन कॉम्पॅक्ट एसयूव्ही

भारतातील सब-4 मीटर एसयूव्ही सेगमेंटमध्ये कमबॅक करण्यासाठी होंडाही सज्ज झालीय. 2028 पर्यंत भारतावर फोकस करून एक नवीन कॉम्पॅक्ट एसयूव्ही लाँच करणार असल्याचं कंपनीने स्पष्ट केलंय. टाटा नेक्सॉन, ह्युंदाई व्हेन्यू, किया सोनेट आणि महिंद्रा XUV 3XO यांसारख्या गाड्यांशी होंडाच्या या नवीन एसयूव्हीची थेट टक्कर असेल. पॉवरट्रेनबद्दल होंडाने अजून डिटेल्स दिलेले नाहीत. पण पेट्रोल इंजिनसोबतच हायब्रिड पॉवरट्रेनचाही विचार सुरू असल्याचं समजतंय. भारतीय ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊनच या एसयूव्हीचं डिझाईन आणि डेव्हलपमेंट केलं जाईल.

टोयोटा अर्बन क्रूझर हायब्रिड

टोयोटाची छोटी एसयूव्ही अर्बन क्रूझरलाही भविष्यात हायब्रिड टेक्नॉलॉजी मिळू शकते. मारुती सुझुकीच्या आगामी झेड-सिरीज इंजिनवर आधारित स्ट्रॉंग हायब्रिड सिस्टीम टोयोटा वापरण्याची शक्यता आहे. पण हायब्रिड व्हर्जनबद्दल टोयोटाने अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. 2027 पर्यंत ही नवीन हायब्रिड एसयूव्ही मार्केटमध्ये येऊ शकते. कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये मायलेज आणि कमी प्रदूषण याला महत्त्व देणाऱ्या ग्राहकांची संख्या वाढतेय. अशातच या हायब्रिड मॉडेल्सची एन्ट्री मार्केटमध्ये मोठी क्रांती घडवून आणू शकते.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Gold Pledge Or Sell : सोनं गहाण ठेवायचं की विकायचं? काही वेळा सोनं विकणं का फायद्याचं ठरतं?
Gold Jewellery Cleaning : टूथपेस्ट आणि बेकिंग सोड्याने सोन्याचे दागिने साफ करताय? ही आहे योग्य पद्धत