5 वर्षांपर्यंतच्या मुलांना हे पदार्थ देऊ नका; पालकांनी आवर्जून द्यावे लक्ष

Published : Dec 23, 2025, 07:00 AM IST

पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांच्या कोणते पदार्थ  देऊ नयेत याबद्दल पालकांनी सतर्क राहावे. या लेखात मध, नट्स, पॉपकॉर्न आणि कोल्ड्रिंक्स यांसारखे पदार्थ मुलांना का देऊ नयेत आणि त्यांचे पचन व आरोग्यावरील संभाव्य धोके काय आहेत, याची माहिती दिली आहे.

PREV
17
मुलांना कोणते पदार्थ देऊ नयेत

मुलांना निरोगी वाढवणे हे प्रत्येक पालकांचे कर्तव्य आहे. पण पालक ते बजावतातही. पण अनेकदा मुले रडून हट्ट करतात तेव्हा पालक त्यांना त्यांचे आवडते हानीकारक  पदार्थ विकत घेऊन देतात. पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना काही पदार्थ अजिबात देऊ नयेत. ते पदार्थ कोणते आहेत आणि ते का देऊ नयेत, याची कारणे या लेखात जाणून घेऊया.

27
मध :

मध आरोग्यासाठी चांगला असतो. यामुळे पचनक्रिया सुधारते आणि शरीराला ऊर्जा मिळते. पण मुलांना जास्त प्रमाणात मध दिल्यास तो सहज पचत नाही. त्यामुळे मध देऊ नये.

37
मांस

व्यवस्थित न शिजवलेले मांस आणि इतर पदार्थ मुलांना देणे टाळा. तसेच, खूप थंड फळांचे रसही मुलांना देऊ नका. कारण ते पचायला जड जातात. 

47
नट्स :

बदाम, पिस्ता, काजू यांसारखे नट्स मुलांच्या आरोग्यासाठी चांगले असले तरी, ते नीट चावून न खाल्ल्यास उलट्या, जुलाब आणि पचनाच्या समस्या होऊ शकतात.

57
कोल्ड्रिंक्स :

कोल्ड्रिंक्समध्ये साखर आणि कॅफीनचे प्रमाण जास्त असते. हे मुलांना दिल्यास पचन, लठ्ठपणा आणि गॅससारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.

67
पॉपकॉर्न

पॉपकॉर्न हा अनेक मुलांचा आवडता नाश्ता आहे. पण त्याचे कण मुलांच्या नाकात अडकल्यास श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. त्यामुळे पालकांनो, पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना पॉपकॉर्न देऊ नका.

77
पफ्स आणि चिप्स :

यामुळे मुलांना अपचन, उलट्या, पोटदुखी होऊ शकते आणि आतड्यांच्या आरोग्यावरही वाईट परिणाम होतो. त्यामुळे मुलांना असे पदार्थ कधीही देऊ नका.

Read more Photos on

Recommended Stories