UCO Bank Recruitment 2026 : युको बँकेत सरकारी नोकरीचा धमाका! पदवीधरांना मोठी संधी, पगार ₹93,000 पर्यंत; असा करा अर्ज

Published : Jan 16, 2026, 04:48 PM IST

UCO Bank Recruitment 2026 : युको बँकेने 2026 साठी 173 स्पेशलिस्ट आणि जनरलिस्ट ऑफिसर पदांसाठी भरती जाहीर केली आहे. पदवीधर आणि सीए उमेदवारांसाठी ही एक मोठी संधी असून, निवड प्रक्रिया ऑनलाइन परीक्षा, गटचर्चा आणि मुलाखतीद्वारे होईल. 

PREV
17
युको बँकेत सरकारी नोकरीचा धमाका! पदवीधरांना मोठी संधी

UCO Bank Recruitment 2026 : बँकिंग क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी नवीन वर्षाची मोठी भेट समोर आली आहे. युको बँक (UCO Bank) मध्ये तब्बल 173 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, यामध्ये 'स्पेशलिस्ट ऑफिसर' आणि 'जनरलिस्ट ऑफिसर' अशा महत्त्वाच्या पदांचा समावेश असून, पगार आणि भत्ते पाहून तुम्ही थक्क व्हाल! 

27
कोणत्या पदांसाठी आहे ही भरती?

या भरती मोहिमेअंतर्गत विविध तांत्रिक आणि व्यवस्थापकीय पदे भरली जाणार आहेत. यात प्रामुख्याने खालील पदांचा समावेश आहे.

ट्रेड फायनान्स ऑफिसर

चार्टर्ड अकाउंटंट (CA) - (सर्वात जास्त ७५ जागा)

नेटवर्क आणि डेटाबेस अॅडमिनिस्ट्रेटर

सायबर सिक्युरिटी आणि डेटा प्रायव्हसी ऑफिसर

क्लाउड इंजिनियर आणि डेटा अॅनालिस्ट 

37
पात्रता आणि वयोमर्यादा

विविध पदांनुसार शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे.

ट्रेड फायनान्स: पदवी + MBA (किमान १ वर्ष अनुभव).

CA पदवीधर: ICAI कडून सीए उत्तीर्ण (अनुभवानुसार JMGS-I किंवा MMGS-II ग्रेड).

आयटी पदे: BE/B.Tech, MCA किंवा संगणक विज्ञान पदवी.

वयोमर्यादा: उमेदवाराचे वय 20 ते 35 वर्षांच्या दरम्यान असावे. 

47
पगार आणि इतर फायदे

युको बँकेतील या नोकरीचे मुख्य आकर्षण म्हणजे मिळणारे आकर्षक वेतन

JMGS-I ग्रेड: ₹48,480 ते ₹85,920 प्रति महिना.

MMGS-II ग्रेड: ₹64,820 ते ₹93,960 प्रति महिना.

अतिरिक्त फायदे: याशिवाय महागाई भत्ता (DA), घरभाडे भत्ता (HRA) आणि वैद्यकीय सुविधा देखील मिळणार आहेत. 

57
महत्त्वाच्या तारखा आणि निवड प्रक्रिया

अर्ज सुरू होण्याची तारीख: 13 जानेवारी 2026

अर्जाची शेवटची तारीख: 02 फेब्रुवारी 2026

निवड कशी होईल?

उमेदवारांची निवड ही ऑनलाइन लेखी परीक्षा, गटचर्चा (Group Discussion) आणि मुलाखतीद्वारे केली जाईल. 

67
निवड कशी होईल?

उमेदवारांची निवड ही ऑनलाइन लेखी परीक्षा, गटचर्चा (Group Discussion) आणि मुलाखतीद्वारे केली जाईल. 

77
कसा कराल अर्ज?

इच्छुक उमेदवारांनी युको बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर www.ucobank.com (किंवा www.uco.bank.in) वर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा. अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Photos on

Recommended Stories