TVS Jupiter: ही स्कूटर एका लिटरमध्ये तब्बल 53.8 किमी मायलेज देते, असा कंपनीचा दावा आहे. यात 113.3 सीसी इंजिन, आधुनिक LED DRLs, डिजिटल आणि ब्लूटूथ इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि समोरून पेट्रोल भरण्याची सोय आहे.
भारतीय दुचाकी बाजारात टीव्हीएसने स्वतःचा एक वेगळा ठसा उमटवला आहे. कंपनीने जून 2026 मध्ये ऐतिहासिक विक्रीची नोंद केली. गेल्या वर्षी जूनमध्ये 2,81,012 वाहने विकली होती, तर यावर्षी जूनमध्ये 4,11,014 युनिट्स विकून 46.26% ची प्रचंड वार्षिक वाढ नोंदवली आहे. या मोठ्या यशात कंपनीची लोकप्रिय स्कूटर 'टीव्हीएस ज्युपिटर'चा मोठा वाटा आहे.
24
विक्रीच्या यादीत टीव्हीएस ज्युपिटर पहिल्या क्रमांकावर
कंपनीच्या विक्रीच्या यादीत टीव्हीएस ज्युपिटर पहिल्या क्रमांकावर आहे. फक्त जून महिन्यातच या स्कूटरच्या 1,36,805 युनिट्सची विक्री झाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही विक्री 26.69% नी वाढली आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, ही स्कूटर एका लिटरमध्ये सुमारे 53.8 किमी मायलेज देते. यात 113.3 सीसी इंजिन, आधुनिक एलईडी डीआरएल, डिजिटल आणि ब्लूटूथ इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि समोरून पेट्रोल भरण्याची सोय आहे. आकर्षक फीचर्स आणि कमी किंमत यामुळे ही फॅमिली स्कूटर ग्राहकांना आणखी आकर्षित करत आहे.
कंपनीच्या इतर गाड्यांनीही विक्रीचे नवे विक्रम केले आहेत. तरुणांची आवडती स्पोर्ट्स बाईक 'टीव्हीएस अपाचे' 55,382 युनिट्सच्या विक्रीसह दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर सामान्य माणूस आणि छोट्या व्यापाऱ्यांची पसंतीची 'टीव्हीएस एक्सएल 100' 50,155 युनिट्सच्या विक्रीसह तिसऱ्या स्थानी आहे. या दोन्ही मॉडेल्सच्या विक्रीत अनुक्रमे 33.82% आणि 50.39% वाढ झाली आहे. इलेक्ट्रिक वाहन सेगमेंटमध्येही टीव्हीएसने मोठी झेप घेतली आहे. कंपनीची 'टीव्हीएस आयक्यूब' इलेक्ट्रिक स्कूटरने गेल्या वर्षीच्या तुलनेत 232% वाढ नोंदवत जूनमध्ये 47,331 युनिट्सची विक्री केली. सोबतच, आधुनिक दिसणारी 'टीव्हीएस एनटॉर्क' स्कूटरही 37,762 युनिट्सच्या विक्रीसह टॉप 5 मध्ये दाखल झाली आहे.
याशिवाय, कंपनीची 'टीव्हीएस रायडर' (36,983 युनिट्स), 'रेडिऑन' (12,920 युनिट्स), 'स्पोर्ट' (11,560 युनिट्स), 'रोनिन' (10,157 युनिट्स), 'झेस्ट' (10,104 युनिट्स) आणि 'अपाचे आरटीएक्स/310' (1,855 युनिट्स) या गाड्यांनीही बाजारात चांगली कामगिरी केली. एकूणच, टीव्हीएसच्या दुचाकींना त्यांच्या परवडणाऱ्या किमती, उत्तम मायलेज आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे देशभरात मोठी मागणी आहे.
Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .