Phone Storage : मेमरी फुल्ल? फोटो-व्हिडिओ न उडवता स्टोरेज मोकळं, सुपर ट्रिक्स!

Jaywant Patil   | CMS
Published : Jul 29, 2026, 11:52 PM IST

तुमच्या फोनची मेमरी फुल्ल झाली आहे का? काळजी करू नका. फोटो आणि व्हिडिओ डिलीट न करताही तुम्ही स्टोरेज मोकळं करू शकता. कसं ते जाणून घ्या आणि फोनची मेमरी वाढवून बिनधास्त वापरा.

PREV
15
स्मार्टफोन युझर्ससाठी सोप्या टिप्स
आजकालच्या स्मार्टफोनमध्ये कॅमेरा क्वालिटी खूप चांगली असते. त्यामुळे फोटो आणि व्हिडिओ जास्त मेमरी घेतात. यामुळे शेकडो जीबी इंटरनल स्टोरेज (Storage Full) असलेले फोनसुद्धा लवकर भरतात आणि हँग होऊ लागतात. अशावेळी आयुष्यभराची आठवण म्हणून जपून ठेवलेले फोटो-व्हिडिओ डिलीट करावे लागतात. पण आता काळजी नको! फोनमधील डेटा डिलीट न करताही तुम्ही स्टोरेज वाढवू शकता. यासाठी काही सोप्या ट्रिक्स आहेत.
25
क्लाउड स्टोरेजमुळे फोटो राहतील सेफ
तुमचे फोटो सुरक्षित ठेवण्यासाठी क्लाउड स्टोरेज हा एक उत्तम पर्याय आहे. अँड्रॉइड युझर्स 'गुगल फोटोज' (Google Photos) किंवा 'गुगल ड्राइव्ह' (Google Drive) वापरू शकतात. यात 'बॅकअप' ऑप्शन चालू केल्यास तुमचे फोटो ऑनलाइन सेव्ह होतात. त्यानंतर तुम्ही फोन गॅलरीतून ते फोटो डिलीट केले तरी चालतील. ॲपल युझर्स 'आयक्लाउड' (iCloud) वापरू शकतात.
35
कॅशे डेटा क्लिअर करा
आपण रोज वापरत असलेले व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम, यूट्यूबसारखे ॲप्स फोनमध्ये भरपूर 'कॅशे डेटा' (Cache Data) जमा करतात. फोनच्या सेटिंग्जमध्ये जाऊन, ॲप मॅनेजरमधून या जंक फाइल्स क्लिअर केल्यास, तुमच्या महत्त्वाच्या फाइल्स डिलीट न होताच काही जीबी स्टोरेज मोकळं होतं.
45
व्हॉट्सॲप मीडिया फाइल्स डिलीट करा
आपल्या फोनची मेमरी भरण्याचं मुख्य कारण म्हणजे व्हॉट्सॲप ग्रुपवर येणारे 'गुड मॉर्निंग' इमेजेस आणि अनावश्यक व्हिडिओ. व्हॉट्सॲपच्या सेटिंग्जमधील 'डेटा अँड स्टोरेज' (Data and Storage) ऑप्शनमध्ये जाऊन, जास्त जागा घेणाऱ्या मोठ्या फाइल्स निवडून तुम्ही त्या डिलीट करू शकता.
55
'लाइट' ॲप्स वापरा
फेसबुक, इन्स्टाग्रामसारख्या मोठ्या साईजच्या ॲप्सऐवजी त्यांची 'लाइट' (Lite) व्हर्जन्स वापरा. हे ॲप्स फोनची इंटरनल मेमरी खूप कमी वापरतात. त्यामुळे फोनची मेमरी लवकर फुल्ल होत नाही.
Read more Photos on

Recommended Stories