US High Paying Jobs : अमेरिकेत कोणत्या नोकऱ्यांना मिळतो सर्वाधिक पगार? भारतीयांसाठी टॉप 7 ऑप्शन्स

Published : Sep 29, 2026, 06:10 PM IST

अमेरिकेत उच्च शिक्षण घेतलेले किंवा कुशल भारतीय आयटी आणि मेडिकल प्रोफेशनल्स नेहमीच जास्त पगार असलेल्या नोकऱ्या शोधतात. पण अमेरिकेत नेमक्या कोणत्या नोकऱ्यांमध्ये सर्वाधिक पगार मिळतो? भारतीयांसाठी बेस्ट ऑप्शन्स कोणते आहेत?

PREV
16
भारतीयांसाठी कोणती नोकरी बेस्ट आहे?

अमेरिकेत नोकरी करून भरपूर पैसे कमवणं, हे अनेक भारतीयांचं स्वप्न असतं. पण तिथे सगळ्याच नोकऱ्यांना सारखा पगार नसतो. काही क्षेत्रांमध्ये मात्र डोळे विस्फारतील एवढे पॅकेजेस मिळतात. विशेषतः मेडिसिन, टेक्नॉलॉजी, मॅनेजमेंट, फायनान्स आणि लॉ क्षेत्रात काम करणाऱ्यांना अमेरिकेत मोठी डिमांड आणि तगडा पगार मिळतो.

भारतीयांसाठी कोणती नोकरी बेस्ट आहे, याचं कोणतंही अधिकृत रँकिंग अमेरिकन सरकार देत नाही. पण H-1B व्हिसा, STEM कोर्सेस, आयटी आणि हेल्थकेअरचा डेटा पाहिला, तर आपले लोक कोणत्या क्षेत्रात बाजी मारत आहेत, हे स्पष्ट दिसतं. USCIS च्या आकडेवारीनुसार, अमेरिकेत मंजूर होणाऱ्या H-1B व्हिसांपैकी तब्बल 71 टक्के व्हिसा भारतीयांना मिळतात. यात कॉम्प्युटर आणि टेक्नॉलॉजी क्षेत्रातील नोकऱ्यांचाच दबदबा आहे.

26
सर्वाधिक पगार देणारे क्षेत्र

अमेरिकेत सर्वाधिक पगार देणारं क्षेत्र म्हणजे मेडिसिन. यूएस ब्युरो ऑफ लेबर स्टॅटिस्टिक्स (BLS) च्या डेटानुसार, फिजिशियन्स आणि सर्जन्सचा सरासरी वार्षिक पगार सुमारे 2.3 कोटी रुपयांपेक्षा जास्त असतो.

• पिडियाट्रिक सर्जन्स: सुमारे ₹4.66 कोटी

• कार्डिओलॉजिस्ट्स: सुमारे ₹4.14 कोटी

• रेडिओलॉजिस्ट्स: सुमारे ₹3.51 कोटी

• सर्जन्स: सुमारे ₹3.45 कोटी

• ॲनेस्थेसियोलॉजिस्ट्स: सुमारे ₹3.26 कोटी

पण भारतात MBBS किंवा PG पूर्ण केलं, म्हणजे तिथे थेट प्रॅक्टिस करता येत नाही. त्यासाठी यूएस मेडिकल लायसेंसिंग एक्झाम्स, क्लिनिकल ट्रेनिंग आणि रेसिडेन्सी यांसारखे टप्पे पार करावे लागतात.

36
सॉफ्टवेअर क्षेत्र

भारतीयांसाठी सर्वात सोपा आणि लोकप्रिय मार्ग म्हणजे सॉफ्टवेअर क्षेत्र. 2025 च्या BLS आकडेवारीनुसार, सॉफ्टवेअर डेव्हलपर्सचा सरासरी पगार सुमारे ₹1.13 कोटी आहे. तर मोठ्या सॉफ्टवेअर पब्लिशिंग कंपन्यांमध्ये हा आकडा ₹1.37 कोटींपर्यंत जातो.

आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI), मशीन लर्निंग, क्लाउड कॉम्प्युटिंग आणि सायबर सिक्युरिटीसारखं स्किल असलेल्या सीनियर प्रोफेशनल्सना वर्षाला ₹1.3 कोटी ते ₹2.9 कोटींपेक्षा जास्त पॅकेज मिळतं.

46
मॅनेजमेंट, इंजिनिअरिंग

टेक क्षेत्रात चांगला अनुभव असेल, तर तुम्ही मॅनेजमेंटकडे वळू शकता. इथे पगार आणखी जास्त असतो.

• कॉम्प्युटर आणि इन्फॉर्मेशन सिस्टीम्स मॅनेजर्स - यांचा सरासरी पगार सुमारे ₹1.60 कोटींपर्यंत असतो.

• इंजिनिअरिंग विभाग - मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सेमीकंडक्टर आणि एरोस्पेस क्षेत्रांचा H-1B व्हिसा मंजुरीमध्ये जवळपास 10 टक्के वाटा आहे. इथे अनुभवानुसार सुमारे ₹70.9 लाख ते ₹1.00 कोटींपेक्षा जास्त पगार मिळू शकतो.

56
पगार किती, कुठे, कसा मिळतो?

कॉर्पोरेट फायनान्स, इन्व्हेस्टमेंट बँकिंग आणि रिस्क मॅनेजमेंट क्षेत्रातही पगार जबरदस्त असतो. इथला सरासरी वार्षिक पगार सुमारे ₹1.56 कोटी आहे. इन्व्हेस्टमेंट बँकिंगमध्ये काम करणाऱ्यांना बेसिक पगारासोबतच भक्कम बोनसही मिळतो. यामुळे त्यांचं एकूण पॅकेज सुमारे ₹1.25 कोटी ते ₹3.34 कोटींच्या घरात जातं.

66
वेगाने आणि सहन मिळणाऱ्या संधी

फक्त पगार बघून अमेरिकेला जाणं शक्य नसतं. तिथे नोकरी करण्यासाठी व्हिसा प्रोसेस आणि टॅक्स सिस्टीम समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे.

• H-1B व्हिसा - हा कुशल कर्मचाऱ्यांसाठी वापरला जातो. FY2024 मध्ये मंजूर झालेल्या H-1B अर्जांमध्ये भारतात जन्मलेले 2,83,397 (71%) लाभार्थी होते.

• L-1, O-1 व्हिसा - इंटरनेट किंवा MNC कंपन्यांच्या अंतर्गत बदल्यांसाठी L-1 व्हिसा, तर असामान्य कौशल्य असलेल्या संशोधकांसाठी O-1 व्हिसा वापरला जातो.

• STEM OPT - अमेरिकेत STEM कोर्सेस केलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना H-1B मिळाला नाही, तरीही तीन वर्षे काम करण्याची संधी मिळते.

अमेरिकेत सर्वाधिक पगार मिळवण्यात डॉक्टर आणि सर्जनसारखे व्यवसाय पहिल्या स्थानावर आहेत. पण भारतीयांना सर्वात वेगाने आणि सहज संधी मिळतात त्या AI, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग, डेटा सायन्स, क्लाउड कॉम्प्युटिंग आणि फायनान्स क्षेत्रात.

Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .
Read more Photos on

Recommended Stories