Best 7 Seater Cars Under 15 Lakhs: १५ लाखांच्या आत येणाऱ्या बेस्ट ७ सीटर कार्स; पाहा भन्नाट ऑप्शन्स

vivek panmand   | CMS
Published : Sep 16, 2026, 07:30 PM IST
Best 7 Seater Cars Under 15 Lakhs: १५ लाखांच्या आत येणाऱ्या बेस्ट ७ सीटर कार्स; पाहा भन्नाट ऑप्शन्स

सार

भारतात १५ लाखांच्या बजेटमध्ये येणाऱ्या बेस्ट ७ सीटर कार्सबद्दल आपण इथं जाणून घेणार आहोत. यात निसान ग्रॅव्हिटास, रेनॉल्ट ट्रायबर, महिंद्रा बोलेरो आणि मारुती सुझुकी अर्टिगा या मॉडेल्सचे फीचर्स आणि किमतीची माहिती दिली आहे. मोठ्या फॅमिलीसाठी या कार्स एकदम परफेक्ट आणि बजेट-फ्रेंडली आहेत.

भारतात मोठ्या फॅमिलीसाठी ७ सीटर कार्सची नेहमीच मोठी डिमांड असते. जास्त लोक आरामात बसू शकतात आणि फॅमिली ट्रिपसाठी या कार्स एकदम परफेक्ट असतात. तुमचं बजेट जर १५ लाखांपेक्षा कमी असेल आणि तुम्ही नवीन ७ सीटर कार घेण्याचा विचार करत असाल, तर मारुती सुझुकी, रेनॉल्ट, निसान आणि महिंद्रा या कंपन्यांचे काही भन्नाट ऑप्शन्स तुम्ही नक्कीच पाहू शकता.

निसान ग्रॅव्हिटास आणि रेनॉल्ट ट्रायबर

निसान ग्रॅव्हिटास आणि रेनॉल्ट ट्रायबर या दोन्ही कॉम्पॅक्ट एमपीव्ही (MPV) एकाच प्लॅटफॉर्मवर बनवल्या आहेत. या दोन्ही कार्समध्ये १.० लिटरचं ३-सिलिंडर पेट्रोल इंजिन दिलंय, जे 71 bhp पॉवर आणि 96 Nm टॉर्क जनरेट करतं. यात ५-स्पीड मॅन्युअल आणि ५-स्पीड एएमटी (AMT) गिअरबॉक्सचे ऑप्शन्स मिळतात. ग्रॅव्हिटासमध्ये कंपनीकडूनच सीएनजी (CNG) किट मिळतं, तर ट्रायबरमध्ये तुम्हाला डीलरकडून किंवा बाहेरून सीएनजी किट बसवून घ्यावं लागतं. या दोन्ही कार्सची सर्वात मोठी खासियत म्हणजे यांची तिसऱ्या रांगेतील सीट तुम्ही पूर्णपणे बाहेर काढू शकता. दुसरी रांग दुमडली तर बूट स्पेस थेट १,००० लिटरच्या वर जातो. यात ८ इंचांची टचस्क्रीन, वायरलेस ॲपल कारप्ले, अँड्रॉइड ऑटो, क्रूझ कंट्रोल, ऑटोमॅटिक हेडलॅम्प्स आणि रेन-सेन्सिंग वायपर्स असे भारी फीचर्स मिळतात. मुंबईत ग्रॅव्हिटासची ऑन-रोड किंमत ₹६.८७ लाख ते ₹१०.८० लाखांच्या दरम्यान आहे, तर ट्रायबरची किंमत ₹६.८१ लाख ते ₹१०.१५ लाखांपर्यंत जाते.

महिंद्रा बोलेरो

जर तुम्हाला एमपीव्ही ऐवजी एखादी रांगडी आणि दमदार ७ सीटर एसयूव्ही (SUV) हवी असेल, तर महिंद्रा बोलेरो हा एक उत्तम पर्याय आहे. या गाडीत १.५ लिटरचं ३-सिलिंडर टर्बो डिझेल इंजिन दिलंय, जे 75 bhp पॉवर आणि 210 Nm टॉर्क देतं. यात ५-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि रिअर-व्हील ड्राईव्ह सिस्टीम मिळते. याच्या लॅडर-फ्रेम चेसीमुळे खराब रस्त्यांवरही ही गाडी एकदम जबरदस्त परफॉर्मन्स देते. यात ७ इंचांची टचस्क्रीन, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, पॉवर स्टिअरिंग, पॉवर विंडोज, सेंट्रल लॉकिंग, स्टिअरिंग माऊंटेड कंट्रोल्स, फोल्ड होणारी तिसरी रांग आणि लेदरेट सीट्स असे फीचर्स दिले आहेत. मुंबईत बोलेरोची ऑन-रोड किंमत ₹१०.१६ लाख ते ₹११.९१ लाखांच्या घरात आहे.

मारुती सुझुकी अर्टिगा

१५ लाखांच्या बजेटमध्ये मारुती सुझुकी अर्टिगा हा आणखी एक लोकप्रिय ७ सीटर ऑप्शन आहे. या कारमध्ये १.५ लिटरचं ४-सिलिंडर K15C स्मार्ट हायब्रिड पेट्रोल इंजिन मिळतं. हे इंजिन 101 bhp पॉवर आणि 139 Nm टॉर्क जनरेट करतं. यात ५-स्पीड मॅन्युअल आणि ६-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचे पर्याय उपलब्ध आहेत. याच्या फॅक्टरी-फिटेड S-CNG व्हेरियंटमध्ये फक्त मॅन्युअल गिअरबॉक्स मिळतो. ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, पुश-बटन स्टार्ट, क्रूझ कंट्रोल, रिअर पार्किंग कॅमेरा आणि ७ इंचांची स्मार्टप्ले प्रो टचस्क्रीन हे याचे काही खास फीचर्स आहेत. दुसऱ्या रांगेत वन-टच टंबल आणि स्लाईड सीट्स, छतावर दिलेले एसी व्हेंट्स आणि मागे USB-C चार्जिंग पोर्ट यांसारख्या सुविधाही यात मिळतात. मुंबईत अर्टिगाची ऑन-रोड किंमत ₹१०.४५ लाख ते ₹१५.४७ लाखांपर्यंत आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Daily Investment : रोज 100 रुपयांची बचत करुन करोडपती होण्याचा सिक्रेट प्लॅन
Electric Scooters : स्टोरेज आणि मायलेजमध्ये एकदम भारी... देशातील टॉप 5 ई-स्कूटर्स