भारतात स्कूटर म्हणजे फक्त प्रवासाचं साधन नाही, तर ती प्रत्येक कुटुंबाच्या रोजच्या जगण्याचा एक महत्त्वाचा भाग बनली आहे. ऑफिसला जाण्यापासून ते मुलांना शाळेत सोडण्यापर्यंत आणि भाजीपाला-किराणा सामान आणण्यापर्यंत, शहरातल्या ट्रॅफिकमध्ये महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना बाईकपेक्षा स्कूटर चालवणं खूप सोपं वाटतं. यामुळेच, भारतात दर महिन्याला लाखो स्कूटर्स विकल्या जातात. तुम्हीही नवीन स्कूटर घेण्याचा विचार करत असाल, तर भारतीयांनी सर्वाधिक पसंत केलेल्या टॉप ५ स्कूटर्सची ही लिस्ट नक्की बघा.
26
होंडा ॲक्टिव्हा (Honda Activa)
भारतीयांची आवडती स्कूटर म्हणून ओळखली जाणारी 'होंडा ॲक्टिव्हा' विक्रीमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. ताज्या रिपोर्टनुसार, कंपनीने तब्बल २,०६,१७० युनिट्स विकून आपलं पहिलं स्थान कायम ठेवलं आहे. कुटुंबातील कोणीही सहज चालवू शकेल अशी ही स्कूटर खूप टिकाऊ आहे.
36
टीव्हीएस ज्युपिटर (TVS Jupiter)
होंडा ॲक्टिव्हाला थेट टक्कर देणारी टीव्हीएस ज्युपिटर दुसऱ्या क्रमांकावर आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या स्कूटरचे सुमारे १,४८,५९५ युनिट्स विकले गेले आहेत. आरामदायी सीट, भरपूर लेग-स्पेस, मोठी डिकी आणि चांगल्या मायलेजमुळे मध्यमवर्गीय कुटुंबांमध्ये ज्युपिटर खूप लोकप्रिय आहे.
१२५ सीसी इंजिन सेगमेंटमध्ये सुझुकी ॲक्सेसचा दबदबा कायम आहे. नुकतेच या स्कूटरचे ८२,५०५ युनिट्स विकले गेले, जी मागील वर्षाच्या तुलनेत तब्बल २१ टक्के जास्त वाढ आहे. क्लासिक लूक, चांगला पिकअप आणि उत्तम मायलेज हवं असणाऱ्यांसाठी ॲक्सेस १२५ एक बेस्ट ऑप्शन आहे.
56
टीव्हीएस आय-क्यूब (TVS iQube)
तुम्ही पेट्रोलऐवजी इलेक्ट्रिक स्कूटर (EV) शोधत असाल, तर टीव्हीएस आय-क्यूब आघाडीवर आहे. एकूण स्कूटर विक्रीत चौथ्या क्रमांकावर असलेल्या या स्कूटरचे जवळपास ५९,३८६ युनिट्स विकले गेले आहेत. वार्षिक आधारावर या स्कूटरने १५८ टक्के वाढ नोंदवून EV मार्केटमध्ये एक नवीन विक्रम केला आहे.
66
बजाज चेतक (Bajaj Chetak)
एकेकाळी भारतीयांची लाडकी असलेली 'चेतक' आता इलेक्ट्रिक अवतारात परत आली आहे. या स्कूटरचे सुमारे ४७,१८४ युनिट्स विकले गेले आहेत. गेल्या वर्षी याच काळात फक्त ११,५८४ युनिट्स विकल्या गेलेल्या चेतकने यावेळी मोठी वाढ नोंदवली आहे. ग्राहक तिच्या मेटल बॉडी आणि प्रीमियम लूकवर फिदा झाले आहेत.
भारतीय दुचाकी बाजारात आता पेट्रोल स्कूटर्ससोबतच इलेक्ट्रिक स्कूटर्सनाही (EV) प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. तुमच्या बजेट आणि गरजेनुसार, तुम्ही वरील टॉप ५ स्कूटर्सपैकी एक स्कूटर डोळे झाकून निवडू शकता.