२०२६ मध्ये भारतातील गेमिंग मार्केटने एक नवी उंची गाठली आहे. अत्याधुनिक ग्राफिक्स, एआय फीचर्स (AI Copilot/NPU) आणि जबरदस्त रिफ्रेश रेट डिस्प्लेसह बाजारात आलेल्या टॉप ५ गेमिंग लॅपटॉप्सची यादी तुम्ही इथे पाहू शकता.
26
१. ASUS ROG Strix SCAR 16 (2026) - अल्टिमेट पॉवरहाऊस
ई-स्पोर्ट्स प्लेयर्स आणि हार्डकोर गेमर्सना परफॉर्मन्समध्ये कोणतीही तडजोड नको असेल, तर हा लॅपटॉप त्यांच्यासाठी बेस्ट चॉईस आहे. फीचर्स: Intel Core Ultra 9 / AMD Ryzen AI 9, NVIDIA GeForce RTX 5080 / 5090 GPU, 32GB/64GB DDR5 रॅम, 2TB SSD.
का खरेदी करावा? यात ट्रिपल-फॅन कूलिंग सिस्टीम आणि लिक्विड मेटल थर्मल टेक्नॉलॉजी मिळते. त्यामुळे सलग हाय-ग्राफिक्स AAA गेम्स खेळतानाही लॅग किंवा हिटिंगचा त्रास होत नाही. किंमत: २,८०,००० ते ३,९९,००० रुपये (अंदाजे).
36
२. Lenovo Legion Pro 5i (Gen 10) – बेस्ट ऑल-राउंडर
योग्य किंमतीत जबरदस्त परफॉर्मन्स हवा असेल, तर लेनोवो लीजन नेहमीच एक विश्वासार्ह पर्याय ठरतो. फीचर्स: Intel Core Ultra 9 275HX / Core i7, NVIDIA GeForce RTX 5070 Ti / RTX 4070, 32GB रॅम, 1TB SSD.
का खरेदी करावा? लीजनचे कोल्डफ्रंट थर्मल मॅनेजमेंट आणि उत्तम कीबोर्ड डिझाईन याला खास बनवतात. गेमिंगसोबतच 4K व्हिडीओ एडिटिंगसाठीही हा एक परफेक्ट ऑल-राउंडर लॅपटॉप आहे. किंमत: १,६०,००० ते २,१०,००० रुपये (अंदाजे).
का खरेदी करावा? ओमेन टेम्पेस्ट कूलिंग सिस्टीम आणि गेमिंग हब सॉफ्टवेअरच्या मदतीने तुम्ही फॅनचा स्पीड आणि पॉवर मोड सहज कंट्रोल करू शकता. या बजेटमध्ये बॅटरी बॅकअपही खूप चांगला मिळतो. किंमत: १,२५,००० ते १,६५,००० रुपये (अंदाजे).
56
४. ASUS TUF Gaming F16 / A15 – मिड-बजेटचा किंग
मिलिटरी-ग्रेड बिल्ड क्वालिटी (MIL-STD-810H) आणि टिकाऊ परफॉर्मन्समुळे बजेटमध्ये हा एक अतिशय पॉवरफुल मशीन ठरतो. फीचर्स: Intel Core i7 14th Gen / AMD Ryzen 7 सिरीज, NVIDIA GeForce RTX 5050 / RTX 4060, 16GB रॅम, 1TB SSD.
डिस्प्ले: १६-इंच 165Hz FHD+/WUXGA, G-Sync सपोर्ट.
का खरेदी करावा? बजेटमध्ये मिळणारी मेटल बॉडी आणि 90Whr बॅटरी याला अधिक आकर्षक बनवतात. कॉलेजचे विद्यार्थी आणि नवीन स्ट्रीमर्ससाठी हा लॅपटॉप एकदम परफेक्ट आहे. किंमत: ८५,००० ते १,१५,००० रुपये (अंदाजे).
66
५. Acer Nitro V 15 / Lite 16 – एंट्री-लेव्हल गेमर्सची पहिली पसंती
कमी बजेटमध्ये प्रीमियम गेमिंगची मजा घ्यायची असेल, तर नवीन गेमर्ससाठी हा एक उत्तम पर्याय आहे. फीचर्स: Intel Core i5 (13th Gen / Core 5 210H), NVIDIA RTX 4050 / RTX 3050 (6GB), 16GB DDR5 रॅम, 512GB SSD.
डिस्प्ले: १५.६-इंच Full HD IPS, 144Hz रिफ्रेश रेट.
का खरेदी करावा? ७० ते ८० हजार रुपयांच्या बजेटमध्ये तुम्ही GTA V, Cyberpunk, Valorant किंवा Call of Duty सारखे गेम्स 1080p रिझोल्युशनवर सहज खेळू शकता. किंमत: ६८,००० ते ८२,००० रुपये (अंदाजे).
Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .