PM किसान योजनेपेक्षा मोठा खजिना! या 5 सरकारी योजना बदलू शकतात शेतकऱ्यांचं नशिब, पण 90% शेतकऱ्यांना अजूनही माहितीच नाहीत!

Published : Jul 28, 2025, 03:23 PM ISTUpdated : Jul 28, 2025, 05:04 PM IST

Top 5 Farmer Schemes : भारतातील शेतकऱ्यांसाठी अनेक सरकारी योजना आहेत ज्या त्यांच्या उत्पन्नात वाढ करू शकतात आणि त्यांचे भविष्य सुरक्षित करू शकतात. या 5 अशा योजनांची माहिती दिली ज्यात पेन्शन, पीक विमा, आधुनिक प्रशिक्षण, आणि सिंचनासाठी मदत करतात.

PREV
17

Top 5 Farmer Schemes : भारतात लाखो शेतकरी अजूनही अशा अनेक महत्वाच्या सरकारी योजनांपासून दूर आहेत, ज्या त्यांच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ करू शकतात, आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडू शकतात आणि त्यांच्या भविष्याची सुरक्षितता सुनिश्चित करू शकतात. जरी PM किसान योजना दरवर्षी 6000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा करत असली, तरी पुढील 5 योजना शेतकऱ्यांसाठी लाखोंचा लाभ, आजीवन पेन्शन, आणि आपत्तीमध्ये संरक्षण यासारखे अनेक फायदे घेऊन आल्या आहेत. चला जाणून घेऊया त्या योजनांबद्दल, ज्या अजूनही बहुतांश शेतकऱ्यांसाठी अपरिचित आहेत.

27

१. प्रधानमंत्री किसान मानधन योजना (PMKMY)

ही योजना 18 ते 40 वयोगटातील लहान आणि सीमांत शेतकऱ्यांसाठी आहे. यामध्ये शेतकऱ्यांना दरमहा केवळ ₹55 ते ₹200 भरावे लागतात आणि सरकारदेखील त्याच इतकी रक्कम जमा करते. 60 वर्षांनंतर शेतकऱ्याला दरमहा ₹3,000 पेन्शन मिळते. ही योजना वृद्धापकाळात आर्थिक आधार बनते, विशेषतः अशा शेतकऱ्यांसाठी जे कमाईच्या इतर कोणत्याही स्त्रोतावर अवलंबून नाहीत.

37

२. प्रधानमंत्री धन-धान्य कृषि योजना (PM Dhan Dhanya Krishi Yojana)

ही नव्याने सुरू झालेली योजना (16 जुलै 2025) देशातील 100 मागास कृषी जिल्ह्यांमध्ये अमलात आणली जात आहे. याअंतर्गत शेतकऱ्यांना आधुनिक प्रशिक्षण, पिकांची विविधता, उत्तम बियाणं, तंत्रज्ञान, आणि बाजारपेठेपर्यंत पोहोच याची सुविधा दिली जाते. ही योजना शेतीला फायदेशीर आणि शाश्वत व्यवसायात रूपांतरित करण्याच्या दृष्टीने एक मोठं पाऊल आहे.

47

३. प्रधानमंत्री फसल बीमा योजना (PMFBY)

जर तुमचं पीक अतिवृष्टी, गारपीट, कीड किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे नष्ट झालं असेल, तर ही योजना तुमच्यासाठी वरदान ठरू शकते. यामध्ये अत्यंत कमी प्रीमियमवर पीकविमा मिळतो, आणि नुकसान झाल्यास थेट खात्यावर नुकसानभरपाई जमा केली जाते. सध्या 50 हून अधिक पिकं या योजनेअंतर्गत समाविष्ट आहेत.

57

४. कृषी उडान योजना (Krishi UDAN Scheme)

ही योजना विशेषतः डोंगरी, आदिवासी आणि ईशान्य भारतातील शेतकऱ्यांसाठी आहे. यामध्ये फळं, भाज्या, फुलं, मासळी आणि दूध यांसारख्या उत्पादक गोष्टी 58 प्रमुख विमानतळांमार्फत देशभर पाठवण्याची सुविधा दिली जाते. त्यामुळे उत्पादने लवकर पोहोचतात, नासधूस कमी होते आणि शेतकऱ्यांना जास्त किंमत मिळते.

67

५. प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना (PMKSY)

"हर खेत को पानी" हे या योजनेचं प्रमुख उद्दिष्ट आहे. यामध्ये शेतकऱ्यांना ड्रिप इरिगेशन, तलाव बांधणी, कालव्यांचं सुधारणं, आणि पाणीसाठा वाढवण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते. विशेषतः अशा भागांमध्ये जिथं मान्सूनवरच शेती अवलंबून आहे, तिथं ही योजना पाण्याच्या टंचाईपासून वाचवण्यासाठी अत्यंत गरजेची आहे.

77

या योजना केवळ आर्थिक सहाय्य देण्यासाठी नाहीत, तर शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी आहेत. तुम्ही जर शेतकरी असाल किंवा त्यांच्याशी संबंधित असाल, तर या योजनांची माहिती आपल्या गावात, जिल्ह्यात पोहोचवा कारण खरी समृद्धी ही माहिती आणि संधी ओळखण्यात आहे!

RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Photos on

Recommended Stories