ओला एस१ एक्स
ओलाच्या एस१ एक्स रेंजमधील इलेक्ट्रिक स्कूटर ६४,९९९ ते ९७,४९९ रुपयांमध्ये (एक्स-शोरूम) उपलब्ध आहेत.
- एस१ एक्स २kWh - ६४,९९९ रुपये - ९५ किमी रेंज
- एस१ एक्स ३kWh - ८१,९९९ रुपये - १५१ किमी रेंज
- एस१ एक्स ४kWh - ९७,४९९ रुपये - १९३ किमी रेंज
ओला रोडस्टर एक्स
ओला रोडस्टर एक्स ८४,९९९ रुपयांच्या (एक्स-शोरूम) सुरुवातीच्या किमतीत विक्रीसाठी उपलब्ध आहे. या इलेक्ट्रिक मोटरसायकलसाठी सध्या बुकिंग सुरू आहे, परंतु ग्राहकांना डिलिव्हरी मे २०२५ मध्ये सुरू होण्याची अपेक्षा आहे.
२.५kWh बॅटरी असलेल्या ओला रोडस्टर एक्सची एक्स-शोरूम किंमत ८४,९९९ रुपये आहे. एका फुल चार्जवर त्याची रेंज १४० किलोमीटर आहे. ३.५kWh बॅटरी असलेला ओला रोडस्टर एक्स तुम्ही ९४,९९९ रुपयांमध्ये (एक्स-शोरूम) खरेदी करू शकता. या मॉडेलची रेंज १९६ किलोमीटर आहे.