Best Phones Under 30000 : 30 हजारांच्या बजेटमध्ये नवीन फोन घेताय? हे 5 भन्नाट ऑप्शन्स नक्की पाहा

Published : Oct 23, 2026, 12:24 PM IST

Best Phones Under 30000: तुम्ही नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करताय का? ३० हजारांच्या बजेटमध्ये मोठा डिस्प्ले, दमदार बॅटरी आणि 5G सपोर्ट असलेले अनेक भारी फोन्स सध्या मार्केटमध्ये उपलब्ध आहेत.

PREV
16
30 हजारांपर्यंतचे फोन

नवीन स्मार्टफोन घेताना फक्त किंमत बघून चालत नाही. फोनचा डिस्प्ले, प्रोसेसर, बॅटरी, चार्जिंग स्पीड आणि सॉफ्टवेअर अपडेट्स या सगळ्या गोष्टी तपासाव्या लागतात. ३० हजारांपर्यंत बजेट असणाऱ्यांसाठी अनेक कंपन्यांनी भारी फीचर्स असलेले फोन्स आणले आहेत. काही फोन्समध्ये तुम्हाला मोठी बॅटरी मिळते, तर काहींमध्ये एकदम कडक डिस्प्ले आणि भारी सॉफ्टवेअरचा अनुभव मिळतो.

26
Realme 16x

तुम्हाला मोठी बॅटरी आणि फास्ट रिफ्रेश रेट असलेला फोन हवा असेल, तर तुम्ही या मॉडेलचा विचार करू शकता. कंपनीने यात 6.8 इंचाचा HD+ डिस्प्ले, 144Hz रिफ्रेश रेट आणि MediaTek Dimensity 6300 प्रोसेसर दिला आहे. फोटोग्राफीसाठी यात 50MP चा मागचा आणि 8MP चा फ्रंट कॅमेरा मिळतो. फोनमध्ये 7,000mAh ची तगडी बॅटरी असून ती 45W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेल्या बेस मॉडेलची किंमत तुम्ही चेक करू शकता. पण लक्षात ठेवा, यात फुल HD+ ऐवजी फक्त HD+ डिस्प्ले मिळतो.

36
OnePlus Nord CE 6 Lite

फास्ट परफॉर्मन्स आणि मोठी बॅटरी शोधणाऱ्यांसाठी हा एक उत्तम पर्याय आहे. यात 6.72 इंचाचा फुल HD+ LCD डिस्प्ले, 144Hz रिफ्रेश रेट आणि MediaTek Dimensity 7400 Apex प्रोसेसर मिळतो. कॅमेऱ्याच्या बाबतीत यात 50MP चा मेन आणि 32MP चा फ्रंट कॅमेरा आहे. 7,000mAh बॅटरीसोबत 45W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट मिळतो. 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेल्या या फोनची किंमत साधारण २८,००० रुपयांच्या आसपास आहे. गेमिंगसाठी हा फोन भारी आहे, पण तुम्हाला AMOLED डिस्प्ले हवा असेल तर इतर पर्याय पाहा.

46
Samsung Galaxy M36 5G

डिस्प्लेची क्वालिटी आणि दीर्घकाळ सॉफ्टवेअर सपोर्ट हवा असणाऱ्यांनी हा फोन नक्की पाहावा. सॅमसंगने यात 6.7 इंचाचा फुल HD+ सुपर AMOLED डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट आणि Exynos 1380 प्रोसेसर दिला आहे. यात 5,000mAh ची बॅटरी आणि 50MP चा प्रायमरी कॅमेरा मिळतो. सॅमसंगचा सॉफ्टवेअर सपोर्ट ही या फोनची जमेची बाजू आहे. 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेल्या या मॉडेलची किंमत साधारण २२,००० रुपयांपासून सुरू होते. बॅटरी थोडी लहान असली तरी AMOLED डिस्प्लेमुळे हा फोन रोजच्या वापरासाठी एकदम बेस्ट आहे.

56
Redmi Note 17 5G

मोठा डिस्प्ले आणि जास्त बॅटरी बॅकअप आवडणाऱ्यांसाठी हा फोन खास आहे. यात 6.99 इंचाचा फुल HD+ AMOLED डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट आणि Snapdragon 4 Gen 4 प्रोसेसर मिळतो. कंपनीने यात तब्बल 8,000mAh ची बॅटरी दिली आहे. कॅमेऱ्याचा विचार केल्यास 50MP चा मागचा आणि 8MP चा फ्रंट कॅमेरा मिळतो. 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेल्या मॉडेलची किंमत साधारण २७,९९९ रुपये आहे. 8GB रॅम मॉडेलची किंमत ३० हजारांच्या पुढे जाऊ शकते, त्यामुळे बजेटनुसार तुम्ही योग्य मॉडेल निवडू शकता.

66
Moto G57 Power 5G

कमी बजेटमध्ये मोठी बॅटरी असलेला फोन शोधत असाल, तर हा फोन तुमच्यासाठी आहे. यात 6.72 इंचाचा फुल HD+ LCD डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट आणि Snapdragon 6s Gen 4 प्रोसेसर मिळतो. फोनमध्ये 7,000mAh ची बॅटरी आणि 33W चार्जिंग सपोर्ट आहे. फोटोग्राफीसाठी 50MP चा मागचा आणि 8MP चा फ्रंट कॅमेरा दिला आहे. 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेल्या या फोनची किंमत साधारण २०,९९९ रुपयांपासून सुरू होते. या लिस्टमधील हा सर्वात स्वस्त फोन आहे. तुमच्या गरजेनुसार तुम्ही योग्य फोन निवडू शकता.

Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .
Read more Photos on

Recommended Stories