Lightweight Scooters : 70000 ते 90000 रुपयांत मिळणारे 4 हलके आणि कमी उंचीचे स्कूटर्स, मायलेजही 50 किमी

Published : Nov 13, 2026, 03:39 PM IST

कमी उंची असणाऱ्या आणि हलक्या वजनाची गाडी चालवायला आवडणाऱ्या लोकांसाठी ९०,००० रुपयांच्या आत मिळणाऱ्या ४ सर्वोत्तम स्कूटर्सची माहिती…

PREV
15
९०,००० रुपयांच्या आत मिळणारे सर्वोत्तम स्कूटर्स

कमी उंची असणाऱ्या आणि हलक्या वजनाची गाडी चालवायला आवडणाऱ्या लोकांसाठी ९०,००० रुपयांच्या आत मिळणाऱ्या ५ स्कूटर मॉडेल्सची माहिती देण्यात आली आहे. या यादीत टीव्हीएस झेस्ट ११० (TVS Zest 110), हिरो प्लेझर+ एक्सटेक (Hero Pleasure+ XTEC), यामाहा फॅसिनो १२५ एफआय (Yamaha Fascino 125 Fi) आणि यामाहा रे झेडआर १२५ (Yamaha Ray ZR 125) या मॉडेल्सचा समावेश आहे. ट्रॅफिकमध्ये थांबताना पाय सहज जमिनीवर टेकावेत यासाठी कमी उंची आणि हलक्या वजनाच्या स्कूटर्सची निवड करणं सोयीचं ठरतं. अशा ४ स्कूटर्सबद्दल सविस्तर माहिती…

25
टीव्हीएस स्कूटी झेस्ट ११० (TVS Scooty Zest 110)

कमी उंची असलेल्या व्यक्ती आणि कॉलेजच्या मुलींसाठी हा एक उत्तम पर्याय आहे. याची सीटची उंची (Seat height) फक्त ७६० मिमी आहे आणि वजन १०३ किलो आहे. यातील १०९.७ सीसी एअर-कूल्ड इंजिन लिटरला ४५ ते ५० किमी मायलेज देतं. याची एक्स-शोरूम किंमत ७०,००० ते कमाल ७५,००० रुपयांपर्यंत आहे.

35
हिरो प्लेझर+ एक्सटेक (Hero Pleasure+ XTEC)

कॉम्पॅक्ट डिझाईन आणि कमी वजन असलेली ही स्कूटर रोजच्या वापरासाठी खूप योग्य आहे. याची सीटची उंची ७६५ मिमी आणि वजन १०४ ते १०६ किलो आहे. ११०.९ सीसी इंजिन असलेल्या या स्कूटरमध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, कॉल आणि एसएमएस अलर्ट, यूएसबी (USB) चार्जिंग पोर्ट या सुविधा आहेत. सुमारे ५० किमी मायलेज देणाऱ्या या स्कूटरची किंमत ७०,००० ते कमाल ८५,००० रुपयांपर्यंत आहे.

45
यामाहा फॅसिनो १२५ एफआय (Yamaha Fascino 125 Fi)

हलक्या वजनाची १२५ सीसी स्कूटर शोधणाऱ्यांसाठी हा एक उत्तम पर्याय आहे. याची सीटची उंची ७८० मिमी आणि वजन फक्त ९८ ते ९९ किलो आहे. यामध्ये स्मार्ट मोटर जनरेटर तंत्रज्ञान, २१ लिटर स्टोअरेज आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी सारखी वैशिष्ट्ये आहेत. लिटरला सुमारे ४९ ते ५५ किमी मायलेज देणाऱ्या या स्कूटरची किंमत ७८,००० ते ९०,००० रुपयांपर्यंत आहे.

55
यामाहा रे झेडआर १२५ (Yamaha Ray ZR 125)

स्पोर्टी लूक आणि हलकी स्कूटर हवी असणाऱ्यांसाठी यामाहा रे झेडआर हा योग्य पर्याय ठरू शकतो. याची सीटची उंची ७८५ मिमी आणि वजन ९९ किलो आहे. १२५ सीसी हायब्रिड इंजिन तंत्रज्ञानावर चालणाऱ्या या स्कूटरमध्ये स्पोर्टी डिझाईन, स्टॉप-स्टार्ट (Stop-start) सिस्टीम आणि उत्तम पिक-अप आहे. याची किंमत ७८,००० ते कमाल ९०,००० रुपयांपर्यंत आहे.

Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .
Read more Photos on

Recommended Stories