भारतात घरगुती गॅस कनेक्शनसाठी केंद्र सरकार काही विशिष्ट नियम पाळते. लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस सप्लाय रेग्युलेशन ऑर्डर, २००० नुसार, सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत एका कुटुंबाकडे एकापेक्षा जास्त घरगुती गॅस कनेक्शन असू शकत नाही. हा नियम इंडेन, भारत गॅस, एचपी गॅस या सर्व सरकारी तेल कंपन्यांना लागू होतो. त्यामुळे, एका कुटुंबाकडे आधीच एका कंपनीचे कनेक्शन असेल, तर दुसऱ्या कंपनीकडून नवीन कनेक्शन घेण्यास सहसा परवानगी मिळत नाही.
25
सरकारच्या मते 'कुटुंब' म्हणजे काय?
या नियमात 'कुटुंब' या शब्दाची स्पष्ट व्याख्या दिली आहे. पती, पत्नी, अविवाहित मुले आणि त्यांच्यावर अवलंबून असलेले पालक जेव्हा एकाच घरात आणि एकाच स्वयंपाकघरात जेवण बनवतात, तेव्हा त्याला एक कुटुंब मानले जाते. अशा घरात जर पतीच्या नावे आधीच गॅस कनेक्शन असेल, तर पत्नी किंवा कुटुंबातील इतर सदस्याच्या नावे दुसरे कनेक्शन मिळवणे सहसा शक्य नसते. अर्जाची पडताळणी करताना कुटुंबाचा तपशील, पत्ता आणि आधीचे कनेक्शन तपासले जाते.
35
एकाच घरात दोन कुटुंबे राहत असतील तर?
एकाच इमारतीत दोन स्वतंत्र कुटुंबे राहतात, एवढेच कारण दोन कनेक्शन मिळवण्यासाठी पुरेसे नसते. ही कुटुंबे खरोखरच वेगळी राहतात का, त्यांची स्वयंपाकघरे वेगळी आहेत का आणि कुटुंबाची रचना कशी आहे, या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. जर स्वयंपाकघरे वेगळी असतील आणि कुटुंबे स्वतंत्र असतील, तर तुम्ही योग्य कागदपत्रांसह गॅस वितरकाकडे अर्ज करू शकता. पत्ता एकच असला तरी स्वतंत्र कुटुंब असल्याची खात्री करण्यासाठी तपासणी केली जाऊ शकते. कनेक्शन द्यायचे की नाही, हे कागदपत्रांची पडताळणी आणि कंपनीच्या नियमांवर अवलंबून असते.
एका कुटुंबाला दोन स्वतंत्र कनेक्शन देण्यास सहसा परवानगी नसते, पण एकाच कनेक्शनवर तुम्ही डबल सिलिंडरची सुविधा नक्की घेऊ शकता. याला डबल बॉटल कनेक्शन (DBC) म्हणतात. यामध्ये एकाच ग्राहकाच्या खात्यावर दोन सिलिंडर दिले जातात. एक सिलिंडर संपल्यावर दुसरा वापरण्यासाठी याचा खूप फायदा होतो. ज्यांच्याकडे आधीच सिंगल सिलिंडर कनेक्शन आहे, ते त्यांच्या वितरकाशी संपर्क साधून डबल सिलिंडर सुविधेची प्रक्रिया आणि शुल्काची माहिती घेऊ शकतात.
55
नियमांचे उल्लंघन केल्यास काय करावे?
एकाच कुटुंबात एकापेक्षा जास्त घरगुती कनेक्शन असल्याचे आढळल्यास, तेल कंपन्या अतिरिक्त कनेक्शन सरेंडर करण्यास सांगू शकतात. जर चुकीने एकाच पत्त्यावर कनेक्शन जोडले गेले असेल, पण प्रत्यक्षात कुटुंबे आणि स्वयंपाकघरे वेगळी असतील, तर आवश्यक कागदपत्रांसह वितरकाशी संपर्क साधा. विशिष्ट अडचण किंवा विशेष परिस्थिती लक्षात घेऊन, केंद्र सरकार किंवा सरकारी तेल कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एकापेक्षा जास्त कनेक्शनसाठी अपवाद म्हणून परवानगी देऊ शकतात. त्यामुळे, जर तुम्हाला दोन कनेक्शन हवे असतील, तर आधी अधिकृत परवानगी आणि पात्रतेचे निकष तपासून घेणे गरजेचे आहे.
Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .