भारतीय दुचाकी बाजारात ग्राहकांकडून 5 पैकी 4.6 रेटिंग मिळवलेल्या टॉप ३ मायलेज बाइक्सची सविस्तर माहिती... कमी मेंटेनन्स आणि उत्तम परफॉर्मन्स देणाऱ्या या बाइक्स तुमच्या रोजच्या प्रवासासाठी बेस्ट पर्याय ठरू शकतात.
भारतीय दुचाकी बाजारात जास्त मायलेज, उत्तम परफॉर्मन्स आणि ग्राहकांचा विश्वास या तिन्ही गोष्टी साध्य केलेल्या ३ सर्वोत्तम बाइक्सची माहिती समोर आली आहे. ग्राहकांकडून 5 पैकी 4.6 रेटिंग मिळवलेल्या होंडा एसपी 125, हिरो एक्स्ट्रीम 125आर आणि हिरो स्प्लेंडर प्लस एक्सटेक या बाइक्सनी वाहनप्रेमींचे लक्ष वेधून घेतले आहे.
24
हिरो स्प्लेंडर प्लस एक्सटेक (Hero Splendor Plus XTEC)
भारतातील अनेक पिढ्यांचा विश्वास जिंकणाऱ्या स्प्लेंडर बाइकचे हे आधुनिक मॉडेल आहे. याला सुमारे ९२८ ग्राहकांनी 4.6 रेटिंग दिले आहे. या बाइकमध्ये 97.2 cc चे सिंगल सिलेंडर इंजिन, 7.9 bhp पॉवर, 8.05 Nm टॉर्क आणि 4-स्पीड गिअरबॉक्स मिळतो. ग्राहकांच्या अनुभवानुसार, ही बाइक प्रति लीटर सुमारे 65 किमी मायलेज देते. यादीत तिने अव्वल स्थान पटकावले आहे. ट्रॅफिकमध्ये इंधन वाचवणारे i3S तंत्रज्ञान, डिजिटल मीटर, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आणि आरामदायक सीट यांसारखे फीचर्स यात आहेत. या बाइकची किंमत 82,000 रुपये आहे.
34
होंडा एसपी 125 (Honda SP 125)
125 सीसी कम्युटर बाइक सेगमेंटमध्ये हे मॉडेल खूप लोकप्रिय आहे. 4,600 पेक्षा जास्त युजर्सनी याला 4.6 रेटिंग दिले आहे. या बाइकमध्ये 123.94 cc चे सिंगल सिलेंडर इंजिन, 10.87 PS पॉवर, 10.9 Nm टॉर्क आणि 5-स्पीड गिअरबॉक्स आहे. रियल-वर्ल्ड डेटा नुसार, ही बाइक प्रति लीटर सुमारे 63 किमी मायलेज देते. एलईडी हेडलाइट्स, डिजिटल मीटर कन्सोल, गिअर पोझिशन इंडिकेटर आणि रिअल-टाइम मायलेज दाखवणारे फीचर्स यात आहेत. या बाइकची किंमत 93,000 रुपये आहे.
तरुण आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या पसंतीस उतरणारा स्पोर्टी लूक या बाइकमध्ये आहे. सुमारे १,९४४ ग्राहकांनी याला 4.6 रेटिंग दिले आहे. यात 124.7 cc सिंगल सिलेंडर इंजिन, 11.4 bhp पॉवर, 10.5 Nm टॉर्क आणि 5-स्पीड गिअरबॉक्स आहे. जास्तीत जास्त 100 किमी प्रति तास वेग पकडणारी ही बाइक प्रति लीटर सुमारे 57 किमी मायलेज देते. आक्रमक डिझाईन, एलईडी लाईट्स, डिजिटल मीटर आणि सुरक्षेसाठी सिंगल-चॅनल एबीएस हे या बाइकचे मुख्य आकर्षण आहे. याची किंमत 99,000 रुपये आहे. कोणती बाइक निवडावी? तज्ज्ञांच्या मते, जास्तीत जास्त मायलेज आणि कमी मेंटेनन्स हवा असल्यास हिरो स्प्लेंडर प्लस एक्सटेक बेस्ट आहे. मायलेज, पॉवर आणि स्मूथ इंजिनसाठी होंडा एसपी 125 उत्तम आहे, तर बजेटमध्ये स्पोर्टी लूक आणि वेगासोबत चांगले मायलेज हवे असल्यास हिरो एक्स्ट्रीम 125आर हा चांगला पर्याय आहे.
Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .