
सकाळी उठल्याबरोबर गुगलवर माहिती शोधणे, गाणी ऐकायला यूट्यूबवर जाणे, मित्रांसोबत गप्पा मारायला व्हॉट्सॲप वापरणे आणि मनोरंजनासाठी इन्स्टाग्राम पाहणे, याशिवाय आपण एका दिवसाचाही विचार करू शकत नाही. पण तुम्हाला माहितीये का, जगभरातील कोट्यवधी लोक रोज वापरत असलेल्या वेबसाईट्समध्ये पहिल्या नंबरवर कोण आहे?
एका महिन्यात १०० अब्जांहून अधिक वेळा कोणती वेबसाईट पाहिली जाते? यूट्यूबपेक्षा जास्त व्हिजिट्स कोणत्या साईटला मिळतात? अलिकडच्या काळात भन्नाट प्रगती केलेल्या AI मधील ChatGPT जगात कितव्या नंबरवर आहे?
इंटरनेटच्या या स्पर्धेत आघाडीवर असलेल्या टॉप १५ वेबसाईट्सची यादी पाहिली तर तुम्हालाही आश्चर्य वाटेल. सप्टेंबर २०२६ च्या ग्लोबल वेबसाईट ट्रॅफिक डेटानुसार आपण ही यादी पाहणार आहोत.
Semrush या प्रसिद्ध डिजिटल मार्केट रिसर्च कंपनीने सप्टेंबर २०२६ ची आकडेवारी जाहीर केली आहे. यावरून ही यादी तयार करण्यात आली आहे.
टॉप १५ वेबसाईट्सबद्दल सविस्तर माहिती
१. गुगल (Google) - पहिल्या स्थानावर वर्चस्व
सप्टेंबर महिन्यातील व्हिजिट्स - १०,८९० कोटी
गुगल सलग जगात सर्वात जास्त पाहिली जाणारी वेबसाईट ठरली आहे. माहिती शोधणे, बातम्या, शिक्षण, नोकरी, व्यवसाय अशा सगळ्याच गोष्टींसाठी लोक गुगलवर अवलंबून आहेत.
सप्टेंबर महिन्यात गुगलला तब्बल १०,८९० कोटी व्हिजिट्स मिळाल्या आहेत. म्हणजेच दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या यूट्यूबपेक्षा गुगल खूप मोठ्या फरकाने पुढे आहे.
२. यूट्यूब (YouTube) - व्हिडिओंचा राजा
सप्टेंबर महिन्यातील व्हिजिट्स - ५,९९७ कोटी
व्हिडिओ पाहणे, गाणी ऐकणे, सिनेमे, कुकिंग, शिक्षण आणि लाईव्ह स्ट्रीमिंगसाठी यूट्यूबचा वापर होतो. गुगलच्या पाठोपाठ यूट्यूब दुसऱ्या नंबरवर असून महिन्याला तब्बल ५,९९७ कोटी व्हिजिट्स या साईटला मिळतात.
३. फेसबुक (Facebook) - सोशल मीडियामध्ये आघाडीवर
सप्टेंबर महिन्यातील व्हिजिट्स - १,२२१ कोटी
मित्र आणि नातेवाईकांच्या संपर्कात राहणे, फोटो आणि व्हिडिओ शेअर करणे, ग्रुप चर्चेत भाग घेणे यासाठी फेसबुक अजूनही लोकप्रिय आहे. १,२२१ कोटी व्हिजिट्ससह ही वेबसाईट जगात तिसऱ्या नंबरवर आहे.
४. चॅटजीपीटी (ChatGPT) - AI ची जबरदस्त प्रगती
सप्टेंबर महिन्यातील व्हिजिट्स - ८२३ कोटी
या यादीत चॅटजीपीटीने (ChatGPT) सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. प्रश्नांची उत्तरे, निबंध, भाषांतर आणि फोटो तयार करण्यासाठी AI चा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.
सप्टेंबर २०२६ मध्ये या साईटला ८२३ कोटी व्हिजिट्स मिळाल्या. Semrush च्या मते, मागील वर्षाच्या तुलनेत यात ३५.२८% वाढ झाली आहे. लोकांच्या रोजच्या इंटरनेट वापरात AI ने आता महत्त्वाची जागा मिळवली आहे, हेच यावरून दिसते.
५. इन्स्टाग्राम (Instagram) - फोटो आणि रील्सप्रेमींची पसंती
सप्टेंबर महिन्यातील व्हिजिट्स - ६८१ कोटी
फोटो, रील्स, स्टोरीज, लाईव्ह व्हिडिओ आणि सेलिब्रिटींचे अपडेट्स पाहण्यासाठी इन्स्टाग्रामचा जोरदार वापर होतो. जगात पाचव्या नंबरवर असलेल्या या साईटला ६८१ कोटी व्हिजिट्स मिळाल्या आहेत.
६. रेडिट (Reddit) - चर्चेचे व्यासपीठ
सप्टेंबर महिन्यातील व्हिजिट्स - ४८२ कोटी
विविध विषयांवरील चर्चा, प्रश्नोत्तरे आणि आपले अनुभव शेअर करण्यासाठी रेडिट (Reddit) लोकप्रिय आहे. ही वेबसाईट जगात सहाव्या नंबरवर आहे.
७. व्हॉट्सॲप (WhatsApp) - संवादाचे मुख्य माध्यम
सप्टेंबर महिन्यातील व्हिजिट्स - ४२६ कोटी
मॅसेजेस पाठवणे, ऑडिओ आणि व्हिडिओ कॉल्स, ग्रुप चॅट आणि फाईल्स शेअर करण्यासाठी रोजच्या जीवनात व्हॉट्सॲप महत्त्वाची भूमिका बजावते.
८. एक्स (X) – ताज्या घडामोडींसाठी
सप्टेंबर महिन्यातील व्हिजिट्स - ४१७ कोटी
राजकारण, खेळ, सिनेमा, जागतिक बातम्या आणि सेलिब्रिटींची मते लगेच जाणून घेण्यासाठी लोक एक्स (X) चा वापर करतात.
९. विकिपीडिया (Wikipedia) - माहितीचा खजिना
सप्टेंबर महिन्यातील व्हिजिट्स - ३८० कोटी
इतिहास, विज्ञान, भूगोल, राजकारण अशा अनेक विषयांची सविस्तर माहिती मिळवण्यासाठी लोक विकिपीडिया वाचतात.
१०. पॉर्नहब - दहाव्या क्रमांकावर
सप्टेंबरमध्ये ३४० कोटी व्हिजिट्ससह ही अडल्ट कंटेट वेबसाईट या यादीत दहाव्या नंबरवर आहे.
११. टिकटॉक (TikTok) - शॉर्ट व्हिडिओंचा ट्रेंड
सप्टेंबर महिन्यातील व्हिजिट्स - २७१ कोटी
शॉर्ट व्हिडिओ, मनोरंजन, डान्स आणि कुकिंगसारख्या ट्रेंडिंग कंटेटसाठी टिकटॉक (TikTok) चा मोठ्या प्रमाणावर वापर होतो.
१२. बिंग (Bing) - मायक्रोसॉफ्टचे सर्च इंजिन
सप्टेंबर महिन्यातील व्हिजिट्स - २३३ कोटी
गुगलला पर्याय म्हणून वापरले जाणारे बिंग (Bing) हे जगातील १२ व्या क्रमांकाचे सर्च इंजिन ठरले आहे.
१३. ॲमेझॉन (Amazon) - ऑनलाइन शॉपिंगमध्ये किंग
सप्टेंबर महिन्यातील व्हिजिट्स - २३२ कोटी
ॲमेझॉन या जगातील प्रमुख ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्मवर इलेक्ट्रॉनिक वस्तू, कपडे आणि घरगुती सामान मोठ्या प्रमाणावर खरेदी केले जाते.
१४. याहू (Yahoo) - जुना इंटरनेट दिग्गज
सप्टेंबर महिन्यातील व्हिजिट्स - २३० कोटी
ईमेल, बातम्या आणि फायनान्स सेवा देणारी Yahoo आजही जगात सर्वाधिक व्हिजिट केल्या जाणाऱ्या वेबसाईट्सपैकी एक आहे.
१५. एक्स व्हिडिओज - १५ व्या क्रमांकावर
सप्टेंबर २०२६ च्या आकडेवारीनुसार २२७ कोटी व्हिजिट्ससह ही साईट १५ व्या स्थानावर आहे. ही देखील एक अडल्ट कंटेट वेबसाईट आहे.
या यादीतील ५ महत्त्वाच्या गोष्टी
१. गुगलचे एकतर्फी वर्चस्व: गुगलला १०,८९० कोटी व्हिजिट्स मिळाल्या आहेत. दुसऱ्या स्थानी असलेल्या यूट्यूबपेक्षा हे प्रमाण १.८ पटीने जास्त आहे.
२. यूट्यूब दुसऱ्या स्थानी: व्हिडिओ प्लॅटफॉर्मची जगभरातील वाढती मागणी यूट्यूबच्या व्हिजिट्सवरून दिसून येते.
३. ChatGPT ची प्रगती: या साईटने एका वर्षात ३५.२८% ची वाढ नोंदवली. AI चा वाढत चाललेला वापर हेच यातून दिसते.
४. सोशल मीडियाची ताकद: फेसबुक, इन्स्टाग्राम, रेडिट, व्हॉट्सॲप, एक्स आणि टिकटॉक या टॉप १५ मध्ये झळकल्या आहेत.
५. सर्च इंजिनची टक्कर: Google पहिल्या, Bing १२ व्या तर DuckDuckGo १६ व्या नंबरवर आहे.
हे आकडे कसे ठरतात?
महत्त्वाची टीप - जगात सर्वाधिक पाहिल्या जाणाऱ्या वेबसाईट्सची सरकार कोणतीही अधिकृत रँकिंग जाहीर करत नाही. या लेखामधील आकडेवारी Semrush ने प्रसिद्ध केलेल्या सप्टेंबर २०२६ च्या Traffic Analytics वर आधारित आहे. हे केवळ अंदाज आहेत, थेट पडताळलेली इंटरनेट वापराची आकडेवारी नाही.