१. रात्री १० नंतर आवाजाचे प्रदूषण नको...
रात्री १० वाजल्यानंतर सहप्रवाशांना त्रास होईल असं वागणं नियमांच्या विरोधात आहे. इअरफोनशिवाय लाउडस्पीकरवर गाणी ऐकणं, फोनवर मोठ्याने ओरडणं किंवा मोठ्याने बोलणं टाळावं. यामुळे झोपलेल्या इतर प्रवाशांना खूप त्रास होतो.
लाइट्सच्या वापरावर निर्बंध
रात्री सगळ्यांना शांतपणे झोपता यावं म्हणून फक्त 'नाईट लाईट' वापरावी. बाकीचे सर्व मुख्य दिवे बंद करणं चांगलं. मध्यरात्री प्रखर दिवे लावल्यास इतरांची झोपमोड होते.
मिडल बर्थचे नियम
ट्रेनमधील लोअर, मिडल आणि अप्पर बर्थच्या वाटपाबाबत स्पष्ट नियम आहेत. मिडल बर्थच्या प्रवाशांनी त्यांचा बर्थ फक्त रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत झोपण्यासाठी वापरावा. बाकीच्या वेळी मिडल बर्थ दुमडून ठेवावा. तसेच रात्री १० नंतर लोअर बर्थच्या प्रवाशांना त्रास होऊ न देण्याचे नियम पाळावेत.
रात्री जेवण ऑर्डर करताना..
बहुतांश गाड्यांमध्ये रात्री १० नंतर ऑनबोर्ड केटरिंग किंवा फूड सर्व्हिस थांबते. त्यामुळे रात्री भूक लागल्यास आधीच जेवणाची सोय करणं किंवा ई-केटरिंगद्वारे फूड ऑर्डर बुक करून तयार ठेवणं उत्तम.
मोबाईल, लॅपटॉप चार्जिंग..
सुरक्षेच्या कारणास्तव अनेक एक्स्प्रेस गाड्यांमध्ये रात्री ११ नंतर चार्जिंग पॉइंटवर वीजपुरवठा थांबवला जातो. त्यामुळे रात्री ११ पूर्वी तुमचे मोबाईल फोन, लॅपटॉप आणि इतर गॅजेट्स चार्ज करून घेणं खूप महत्त्वाचं आहे.
ट्रेनचा प्रवास सगळ्यांचाच असतो.. सहप्रवाशांच्या सोयीचा आदर करत रेल्वेचे हे छोटे छोटे नियम पाळले तर आपला प्रवास अतिशय सुरक्षित आणि शांततेत पार पडेल.