
मुंबई : मुंबईतील नामांकित टाटा मूलभूत संशोधन संस्था (Tata Institute of Fundamental Research - TIFR) येथे विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. एकूण 23 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली असून विज्ञान, सुरक्षा आणि प्रशासन क्षेत्रात करीयर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही भरती सुवर्णसंधी आहे.
वैज्ञानिक अधिकारी (ब)
प्रशासकीय सहाय्यक (ब)
सहाय्यक सुरक्षा अधिकारी (अ)
लिपिक (अ)
प्रयोगशाळा सहाय्यक (ब)
कार्य सहाय्यक
सुरक्षा रक्षक
प्रकल्प वैज्ञानिक अधिकारी (क)
प्रकल्प प्रयोगशाळा सहाय्यक (ब) [फिटर ट्रेड]
एकूण रिक्त पदे: 23
नोकरी ठिकाण: मुंबई
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 ऑगस्ट 2025 (जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 22 दिवसांच्या आत).
अर्ज सादर करण्याचा पत्ता (ऑफलाइनसाठी): प्रशासकीय अधिकारी (डी), भरती कक्ष, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, 1, होमी भाभा रोड, नेव्ही नगर, कुलाबा, मुंबई 400005.
अधिक माहिती आणि तपशीलवार जाहिरातीसाठी, टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या अधिकृत वेबसाइट http://www.tifr.res.in/ ला भेट द्या. या संधीचा लाभ घेण्यासाठी पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत!