टाटाची SUV झाली स्वस्त, कारमध्ये सर्वात कमी जीएसटी; किंमत वाचून म्हणाल- आजच येतो घरी घेऊन

Published : Nov 17, 2025, 05:00 PM IST

टाटा नेक्सॉन सलग दोन महिने विक्रीत अव्वल ठरली असून, जीएसटी दरात घट झाल्यामुळे तिच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे. ७.३२ लाखांपासून सुरू होणारी ही कार तिच्या किंमतीमुळे आणि ६ एअरबॅग्स सारख्या उत्कृष्ट सेफ्टी फीचर्समुळे ग्राहकांच्या पसंतीस उतरली आहे.

PREV
16
टाटाची SUV झाली स्वस्त, सर्व कारमध्ये बसतो सर्वात कमी जीएसटी; किंमत वाचून म्हणाल आजच येतो घरी घेऊन

टाटा कंपनीच्या गाड्या मोठ्या प्रमाणावर लोकांनी खरेदी केल्या आहेत. या गाड्या खरेदी केल्यानंतर लोकांना मोठ्या प्रमाणावर सूट मिळाली आहे. आपण हि गाडी कोणती आहे ते जाणून घेऊयात.

26
दोन महिने विक्रीत राहिली क्रमांक एकवर

दोन महिने गाड्यांच्या विक्रीमध्ये टाटा कंपनीची हि गाडी क्रमांक एकवर राहिली आहे. आपण हि कार कोणती आहे त्याबद्दलची जाणून घेऊयात. ऑक्टोबर २०२५ च्या महिन्यात या गाड्यांची तब्बल २२ हजार ८३ गाड्यांची विक्री झाली आहे.

36
सलग दोन महिने गाडीची झाली चांगली विक्री

सलग दोन महिने या गाडीची चांगली विक्री झाली आहे. इतर कोणतीही कार या गाडीपुढे टिकू शकत नाही. एप्रिल ते सप्टेंबर २०२५ या काळात ९० हजार या गाड्यांची विक्री झाली आहे.

46
जीएसटी दरात घट झाल्यामुळे गाडीच्या खरेदीत झाली वाढ

जीएसटी दरात घट झाल्यामुळे या गाडीच्या खरेदीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. नव्या जीएसटी दरातील १ लाख ५५ हजारांची घट झाली आणि टाटा Nexon गाडीची विक्री वाढली.

56
टाटाची हि गाडी किती रुपयांना मिळणार?

टाटाची हि गाडी अतिशय स्वस्त दरात ग्राहकांना मिळणार आहे. आता या कारची किंमत ७ लाख ३२ हजार असून अनेक बजेटमधील गाड्या घेणाऱ्या ग्राहकांसाठी ही गाडी एक चांगला पर्याय म्हणून उपलब्ध झाली.

66
सेफ्टीच्या बाबतीत जबरदस्त गाडी

सेफ्टीच्या बाबतीत टाटाच्या गाड्या जबरदस्त असतात, तशीच हि गाडी टॉपच निघाली आहे. या गाडीमध्ये ६ एअरबॅग्स असल्यामुळं प्रवाशांना प्रवास करताना कोणत्याही प्रकारची चिंता करायची गरज नाही.

Read more Photos on

Recommended Stories