Swiggy Report : भारतीयांच्या खवय्येगिरीची कल्पना तर सर्वांनाच आहे. त्यात बिर्याणीची क्रेझ किती आहे हे वेगळं सांगायला नको. 2025 च्या ऑनलाइन ऑर्डर्समध्ये बिर्याणीने धुमाकूळ घातला आहे. स्विगीने जाहीर केलेल्या रिपोर्टमधून अशा गोष्टी समोर आल्या आहेत.
देशात अनेक प्रकारचे खाद्यपदार्थ उपलब्ध असले तरी खवय्यांची पहिली पसंती बिर्याणीलाच आहे. बर्गर, पिझ्झा आणि डोसा लोकप्रिय होत असले तरी, ऑनलाइन ऑर्डर्समध्ये बिर्याणीचे वर्चस्व स्पष्टपणे दिसते. प्रमुख फूड डिलिव्हरी ॲप स्विगीने आपल्या 2025 च्या रिपोर्टमध्ये ही माहिती दिली आहे. या वर्षी एकूण 9.3 कोटी बिर्याणी ऑर्डर्सची नोंद झाली.
25
मिनिटाला शेकडो ऑर्डर्स
ऑनलाइन ग्राहकांकडून सर्वाधिक मागणी असलेला पदार्थ म्हणजे बिर्याणी. स्विगीच्या अंदाजानुसार, मिनिटाला सरासरी 194 बिर्याणी ऑर्डर्स येतात. यामध्ये चिकन बिर्याणी आघाडीवर असून, नुसत्या चिकन बिर्याणीला 5.77 कोटी ऑर्डर्स मिळाल्या.
35
फास्ट फूडची टॉप लिस्ट
बिर्याणीनंतर फास्ट फूडला मोठी मागणी दिसून आली. या वर्षी बर्गरसाठी 4.42 कोटी ऑर्डर्स आल्या, तर पिझ्झाच्या ऑर्डर्स 4.01 कोटींवर पोहोचल्या. पारंपरिक डोसाही मागे नाही. त्याला 2.62 कोटी ऑर्डर्स मिळाल्याचे रिपोर्टमध्ये म्हटले आहे.
स्थानिक पदार्थांबद्दल लोकांमध्ये आवड वाढत आहे. डोंगराळ भागातील पदार्थांच्या ऑर्डर्स नऊ पटींनी वाढल्याचे स्विगीने म्हटले आहे. मलबारी, राजस्थानी, मालवणी यांसारख्या प्रादेशिक पदार्थांच्या ऑर्डर्स दुप्पट झाल्या आहेत. दुपारच्या जेवणापेक्षा रात्रीच्या जेवणाच्या वेळी जास्त ऑर्डर्स येत असल्याचे रिपोर्टमध्ये स्पष्ट झाले आहे. परदेशी पदार्थांनाही चांगला प्रतिसाद मिळाला. मेक्सिकन पदार्थांना 1.6 कोटी, तिबेटी पदार्थांना 1.2 कोटी आणि कोरियन फूडला 47 लाख ऑर्डर्स मिळाल्या.
55
विक्रमी स्तरावरील ऑर्डर्स
ऑनलाइन ऑर्डर्समध्ये काही मनोरंजक घटना घडल्या आहेत. हैदराबादमधील एका ग्राहकाने एकाच वेळी 47 हजार रुपये किमतीचे 65 बॉक्स ड्रायफ्रूट बिस्किटे ऑर्डर केली. मुंबईतील एकाने या वर्षी एकूण 3 हजार वेळा ऑर्डर करून विक्रम केला आहे. म्हणजेच, त्याने दिवसाला सरासरी नऊ ऑर्डर्स दिल्या, असे स्विगीने सांगितले. देशभरात हा सर्वाधिक आकडा असल्याचेही म्हटले आहे.