२२ सप्टेंबरपासून या वस्तू होणार स्वस्त!, पाहा तुमच्याही घरातील खर्च किती कमी होणार?

Published : Sep 21, 2025, 07:22 PM IST

GST Cut September 22 Cheaper Items List: केंद्र सरकारने जीएसटी परिषदेच्या बैठकीत मोठा निर्णय घेतला आहे. उद्या, २२ सप्टेंबर २०२५ पासून साबण, इलेक्ट्रॉनिक्स, सिमेंट, औषधे आणि वाहने यांसारख्या अनेक दैनंदिन गरजेच्या वस्तूंवरील जीएसटी दर कमी होणार आहेत.

PREV
19
उद्यापासून महागाईत दिलासा!

नवी दिल्ली: महागाईच्या झळा बसलेल्या सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. जीएसटी परिषदेच्या बैठकीत अनेक दैनंदिन गरजेच्या वस्तूंवरील जीएसटी दर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून तो उद्या, २२ सप्टेंबर २०२५ पासून लागू होणार आहे. यामुळे घरगुती वस्तू, इलेक्ट्रॉनिक्स, बांधकाम साहित्य, शिक्षण साहित्य तसेच औषधे यांची किंमत कमी होणार आहे. 

29
कुठल्या वस्तू होणार स्वस्त?

साबण, शॅम्पू, टूथपेस्ट 

रोजच्या वापरातील या वस्तूंवर जीएसटी १८% वरून ५% पर्यंत कमी.

49
सिमेंट

घरबांधकामासाठी अत्यावश्यक असलेल्या सिमेंटवर २८% ऐवजी फक्त १८% जीएसटी. 

59
औषधे व वैद्यकीय उपकरणे

जीवनरक्षक औषधे, निदान किट्स व हेल्थ उपकरणांवर आता १२% किंवा १८% ऐवजी फक्त ५% किंवा शून्य टक्के जीएसटी. 

69
शैक्षणिक साहित्य

पेन्सिल, क्रेयॉन, खोडरबर, कॉम्पास बॉक्स, नोटबुक यावर १२% जीएसटी थेट ५% किंवा शून्यावर. 

79
वाहने (ऑटोमोबाईल्स)

३५० सीसीपेक्षा कमी क्षमतेची दुचाकी व छोट्या कारवरील दर २८% वरून १८%. 

89
डेअरी व पॅकेज्ड फूड

तूप, लोणी, चीज आणि पॅकेज्ड खाद्यपदार्थ आता १२% ऐवजी ५% जीएसटीवर उपलब्ध. 

99
कंपन्यांचा जल्लोष, ग्राहकांसाठी भेट

जीएसटी कपातीचा परिणाम थेट एसी, डिशवॉशर, फ्रिज यांसारख्या वस्तूंवर दिसून येणार आहे. व्होल्टास, डायकिन, गोदरेज अप्लायन्सेस, पॅनासोनिक, हायर आदी एसी कंपन्यांनी २ ते ८ हजार रुपयांपर्यंत किंमती कमी करण्याची घोषणा केली आहे. बॉशसारख्या कंपन्या डिशवॉशर व इतर उपकरणांवरील दरही कमी करत आहेत. कपातीमुळे ऑक्टोबर महिन्यात ग्राहकांच्या खिश्यावरचा भार कमी होऊन खरेदी अधिक परवडणारी होणार आहे.

RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Photos on

Recommended Stories