Mumbai To Goa Special Train: उन्हाळ्याच्या सुट्टीत गोव्याचा प्लॅन करताय? मध्य रेल्वेने दिली गुड न्यूज; 'या' तारखेपासून धावणार हॉलिडे स्पेशल ट्रेन!

Published : Apr 01, 2026, 05:46 PM IST

Mumbai to Goa special train: उन्हाळ्याच्या सुट्टीत कोकण आणि गोव्याला जाणाऱ्या पर्यटकांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने 'हॉलिडे स्पेशल एक्सप्रेस' जाहीर केली. ५ एप्रिलपासून धावणारी ही विशेष ट्रेन मुंबई ते मडगाव दरम्यान धावणार आहे.

PREV
16
उन्हाळ्याच्या सुट्टीत गोव्याचा प्लॅन करताय? मध्य रेल्वेने दिली गुड न्यूज

मुंबई: एप्रिल आणि मे महिना म्हटलं की प्रत्येकाला वेध लागतात ते कोकण आणि गोव्याच्या सहलीचे! वाढत्या उन्हामुळे पर्यटकांची पावले समुद्रकिनाऱ्यांकडे वळू लागली आहेत. हीच तुफान गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वेने प्रवाशांना मोठा दिलासा दिला आहे. नियमित गाड्यांचे वेटिंग लिस्ट पाहून हताश झालेल्या पर्यकांसाठी खास 'हॉलिडे स्पेशल एक्सप्रेस' जाहीर करण्यात आली आहे. 

26
५ एप्रिलपासून प्रवासाची संधी

मुंबईकरांना थेट गोव्याच्या किनाऱ्यावर पोहोचवण्यासाठी ५ एप्रिलपासून ही विशेष ट्रेन रुळावर धावणार आहे. आठवड्यातून एकदा चालवल्या जाणाऱ्या या ट्रेनमुळे प्रवाशांची मोठी सोय होणार आहे. 

36
ट्रेनचे वेळापत्रक खालीलप्रमाणे असेल

ट्रेन क्र. ०१११९ (डाऊन): लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) वरून दर रविवारी मध्यरात्री १२:५५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी मडगावला पोहोचेल.

ट्रेन क्र. ०११२० (अप): मडगाव स्थानकावरून दर शुक्रवारी सायंकाळी ४:०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ३:३० वाजता मुंबईत (LTT) पोहोचेल. 

46
या महत्त्वाच्या स्थानकांवर असेल थांबा

प्रवाशांच्या सुविधेसाठी ही गाडी कोकणातील प्रमुख स्थानकांवर थांबणार आहे. यामध्ये ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी आणि करमाळी या स्थानकांचा समावेश आहे. 

56
डब्यांची रचना (Coach Composition)

प्रवाशांना सुखकर प्रवासाचा अनुभव मिळावा यासाठी या ट्रेनमध्ये विविध श्रेणींचे डबे जोडण्यात आले आहेत.

एसी कोच: २ (टू टियर), ८ (थ्री टियर)

स्लीपर कोच: ४

जनरल कोच: ६

इतर: २ जनरेटर कार 

66
पर्यकांसाठी सुवर्णसंधी

शाळा आणि महाविद्यालयांना सुट्ट्या लागल्याने सध्या गोव्याला जाणाऱ्यांची मोठी झुंबड उडाली आहे. अशा वेळी कन्फर्म तिकीट मिळवणे कठीण जाते. म्हणूनच, जर तुम्ही अद्याप तिकीट बुक केले नसेल, तर या विशेष ट्रेनचा पर्याय तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरू शकतो. समुद्राच्या लाटा आणि कोकणची निसर्गसंपदा अनुभवण्यासाठी आता ही 'स्पेशल एक्सप्रेस' सज्ज आहे!

RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Photos on

Recommended Stories