
मुंबई : आपल्या मुलीच्या भविष्यासाठी, तिच्या शिक्षणासाठी प्रत्येका आई-वडिलांना काळजी असते. त्यामुळे वेळेआधीच एखादी चांगली गुंतवणूक करणं फायद्याची ठरते. जेणेकरुन ज्यावेळी गरज असेल, त्यावेळी त्या गुंतवणुकीचा फायदा करता येतो.
आता लहानशी केलेली गुंतवणूक पुढील काळात मोठा भार कमी करते. अशीच एक सरकारी योजना आहे, ज्यात सुरक्षित गुंतवणुकीसह चांगले रिटर्न्सदेखील मिळतात. ही योजना आहे सुकन्या समृद्धी योजना. Sukanya Samriddhi Yojana सरकारी असल्याने यात रिस्कदेखील कमी असते. सध्याच्या शेअर मार्केटच्या अनिश्चततेचा कोणताही परिणाम या योजनेवर होत नाही. या योजनेत वर्षाला ८.२० टक्के व्याज मिळतं.
चक्रवाढ व्याजाचा फायदा
या योजनेत अतिशय फायद्याची एक गोष्ट आहे. म्हणजेच हे अकाऊंट एका सुरू केलं, की ते २१ वर्ष सुरू राहतं. पण तुम्ही केवळ पहिल्या १५ वर्षात यात रक्कम भरू शकता. पुढील ६ वर्षात तुम्ही पैसे भरले नाही, तरी व्याज मिळतं. हे व्याज चक्रवाढ व्याजाने मिळत राहतं.
किती गुंतवणूक केल्यावर २१ वर्षात किती पैसे मिळतील?
समजा, महिन्याला एखाद्या पालकांनी १२ हजार रुपये गुंतवणूक केली, तर १५ वर्षात त्याची मुद्दल २१,६०,००० इतकी होते. पण यावरील व्याज मिळून एकूण ६६ लाख रुपये जमा करता येतील.
तुम्ही दर महिन्याला ५००० रुपये जमा केले. तर १५ वर्षांची तुमची एकूण गुंतवणूक ९,००,००० रुपये होते. पण यावर मिळणारं ८.२० टक्के व्याज जमा झाल्यानंतर ही ९ लाखांची रक्कम २५ लाख इतकी होते.
एखाद्या गुंतवणुकदाराला ५००० रुपये जमा करता येत नसतील, तर तो १००० रुपयेही गुंतवू शकतो. या हिशोबाने मुद्दल गुंतवणूक १,८०,००० होते. त्यानंतर २१ वर्षात व्याजासह एकूण रक्कम ५ लाख होते.
महिन्याला ३००० रुपये जमा केले, तर मुद्दल रक्कम १५ वर्षात ५,४०,००० इतकी होते. त्यानंतर व्याजसह २१ वर्षात एकूण रक्कम १५ लाख रुपये जमा होईल.