Bike Market: एथरने आपल्या स्कूटर्ससाठी 'व्हॉइस ऑन एथर' नावाचं एक नवीन फीचर आणलं आहे. यामुळे आता स्कूटर चालवताना स्क्रीनला हात न लावता, फक्त बोलून तुम्ही नेव्हिगेशन, म्युझिक, कॉल्स आणि रायडिंग मोड कंट्रोल करू शकाल.
भारतातील इलेक्ट्रिक दुचाकींची बाजारपेठ वेगाने वाढत आहे. कंपन्या आता फक्त जास्त रेंज आणि दमदार बॅटरीवरच नाही, तर प्रवास अधिक सुरक्षित आणि सोपा करणाऱ्या आधुनिक फीचर्सवरही लक्ष केंद्रित करत आहेत. याचंच एक पाऊल म्हणून, एथरने आपल्या ग्राहकांसाठी 'एथर व्हॉइस' हे नवीन तंत्रज्ञान सादर केलं आहे.
25
आता स्कूटर ऐकेल तुमच्या कमांड्स
या नवीन फीचरमुळे, स्कूटर चालवताना स्क्रीनला हात लावण्याची गरज कमी होते. तुम्ही फक्त आवाजानेच नेव्हिगेशन सुरू करू शकता, गाणी बदलू शकता, कॉल्स मॅनेज करू शकता आणि रायडिंग मोडही बदलू शकता. यामुळे ड्रायव्हरचं संपूर्ण लक्ष रस्त्यावर राहतं.
35
सहज भाषा समजणारं तंत्रज्ञान
यामध्ये नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग (NLP) तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. त्यामुळे, तुम्हाला विशिष्ट शब्दच वापरावे लागतील असं काही नाही. 'मला घरी घेऊन चल' किंवा 'जवळच्या मॉलकडे ने' अशा आपल्या नेहमीच्या बोलण्यातल्या कमांड्ससुद्धा ही सिस्टीम समजून घेते आणि त्यानुसार काम करते, असं कंपनीने सांगितलं आहे.
हे फीचर फक्त नवीन गाड्यांसाठीच नाही, तर तिसऱ्या जनरेशनच्या आणि त्यानंतरच्या मॉडेल्स वापरणाऱ्या ग्राहकांनाही मिळणार आहे. यासाठी कोणतंही वेगळं हार्डवेअर बसवावं लागणार नाही. फक्त एका ओव्हर-द-एयर (OTA) सॉफ्टवेअर अपडेटद्वारे हे फीचर तुम्हाला मिळेल.
55
भविष्यातील प्रवासाची नवी ओळख
आजकाल इलेक्ट्रिक वाहनं वापरणारे ग्राहक सुरक्षित, सोयीस्कर आणि आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त प्रवासाचा अनुभव अपेक्षीत करतात. एथरचं हे नवीन तंत्रज्ञान त्यांची हीच अपेक्षा पूर्ण करण्याचा एक प्रयत्न आहे. भविष्यात व्हॉइस कंट्रोल हे इलेक्ट्रिक दुचाकींमधील एक महत्त्वाचं फीचर बनण्याची शक्यता आहे.