Social Media Growth: इन्स्टाग्रामवर रील्स आणि पोस्ट्स, यापैकी कशाला जास्त रीच मिळतो? 2026 च्या लेटेस्ट डेटानुसार कोणतं माध्यम बेस्ट आहे, याची संपूर्ण माहिती इथे जाणून घेऊया.
इन्स्टाग्राम: रील्स विरुद्ध पोस्ट्स.. काय आहे बेस्ट?
इन्स्टाग्राम क्रिएटर्स, बिझनेस अकाऊंट्स आणि इन्फ्लुएन्सर्स, या सगळ्यांच्या मनात 2026 मध्ये एकच प्रश्न आहे. इन्स्टाग्राम रील्स करायचे की नेहमीच्या पोस्ट्स टाकायच्या? कशाला जास्त रीच आणि एंगेजमेंट मिळते? नवीन ऑडियन्सपर्यंत पोहोचण्यासाठी रील्स भारी आहेत, तर एंगेजमेंटसाठी पोस्ट्स आणि कॅराउझल्स मदत करतात.
24
रीचच्या बाबतीत रील्सचाच वरचष्मा!
2026 मध्ये रील्सचा सर्वात मोठा फायदा म्हणजे डिस्कव्हरी. इन्स्टाग्रामची रँकिंग सिस्टीम फीड पोस्ट्सच्या तुलनेत रील्सला वेगळ्या प्रकारे हाताळते. रील्स तुम्हाला फॉलो न करणाऱ्या लोकांपर्यंतही पोहोचतात. लहान अकाऊंट्सवर सिंगल इमेज पोस्टपेक्षा रील्सला दोन ते तीन पट जास्त रीच मिळत आहे.
34
पोस्ट्स आणि कॅराउझल्स अजूनही ट्रेंडिंगमध्येच
रील्सला जास्त रीच मिळत असला तरी, फोटो पोस्ट्स आणि कॅराउझल्सचं महत्त्व कमी झालेलं नाही. विशेषतः कॅराउझल्सना 2026 मध्ये जास्त 'सेव्ह' मिळत आहेत. एज्युकेशनल कंटेंट, ट्युटोरियल्ससाठी कॅराउझल्स हा उत्तम पर्याय आहे. इन्स्टाग्राम आता ओरिजिनल कंटेंटला जास्त महत्त्व देत आहे.
एकाच फॉरमॅटवर अवलंबून न राहता मिक्स्ड कंटेंट स्ट्रॅटेजी वापरा, असा सल्ला तज्ज्ञ देतात. नवीन ऑडियन्ससाठी रील्स आणि अकाऊंटची विश्वासार्हता वाढवण्यासाठी कॅराउझल्स वापरा. जास्तीत जास्त रीचसाठी रील्स उत्तम आहेत, पण दीर्घकाळात यश मिळवण्यासाठी रील्ससोबतच दमदार कॅराउझल पोस्ट्स करणंही महत्त्वाचं आहे.