Chanakya Niti :आचार्य चाणक्य यांच्या नीतीनुसार, काही विशिष्ट परिस्थितीत आपलीच माणसं, अगदी जन्मदाते आई-वडील आणि जोडीदारही शत्रूसारखे वाटू लागतात. अशा कोणत्या परिस्थिती आहेत, ज्यामुळे कुटुंबात असे संबंध निर्माण होऊ शकतात, हे जाणून घेऊया.
Chanakya Niti : आचार्य चाणक्य एका श्लोकातून सांगतात की कोणत्या परिस्थितीत जवळची माणसं शत्रू बनतात. ऋणकर्ता पिता शत्रुर्माता च व्यभिचारिणी। भार्या रूपवती शत्रुः पुत्रः शत्रुरपण्डितः॥ याचा अर्थ असा की, कर्जबाजारी वडील, चारित्र्यहीन आई, अत्यंत सुंदर (पण बेजबाबदार) पत्नी आणि मूर्ख मुलगा हे शत्रूसमान असतात.
24
1. कर्ज करून ठेवणारे वडील
चाणक्य नीतीनुसार, जे वडील मुलांवर कर्जाचा डोंगर सोडून जातात, ते मुलांसाठी शत्रूसमान ठरतात. कारण मुलांचं आयुष्य ते कर्ज फेडण्यातच निघून जातं आणि त्यांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो. त्यामुळे प्रत्येक वेळी वडिलांबद्दल त्यांच्या मनात राग निर्माण होतो. म्हणूनच, प्रत्येकाने आपल्या क्षमतेनुसारच कर्ज घ्यावे.
34
2. चारित्र्यहीन आई आणि सुंदर पत्नी
ज्या आईचे चारित्र्य ठीक नसते आणि जी कुटुंबाकडे दुर्लक्ष करते, ती मुलांच्या नजरेत शत्रू बनते. तिच्या वागण्यामुळे मुलांना समाजात मान मिळत नाही आणि त्यांच्या भविष्यावर वाईट परिणाम होतो. त्याचप्रमाणे, जी पत्नी फक्त स्वतःच्या सौंदर्याची काळजी घेते पण घराच्या जबाबदाऱ्या पार पाडत नाही, ती पतीसाठी शत्रूसमान असते. तिच्यामुळे पतीवरचा भार वाढतो आणि वैवाहिक जीवनात अडचणी येतात.
आचार्य चाणक्य सांगतात की, जी मुलं शिकूनही अविवेकी आणि मूर्ख राहतात, ती पालकांसाठी शत्रू ठरतात. ज्या मुलांना चांगले-वाईट यातील फरक कळत नाही आणि जे चुकीच्या मार्गाला लागतात, ते भविष्यात कुटुंबासाठी समस्या निर्माण करतात. त्यामुळे पालक अशा मुलांना शत्रू मानू लागतात.