
Smartphones Launch November 2025 : नोव्हेंबर महिना तंत्रज्ञानप्रेमींसाठी खास ठरणार आहे. कारण या महिन्यात अनेक नामांकित ब्रँड्सकडून दमदार फीचर्स, प्रिमियम डिझाईन आणि अत्याधुनिक कॅमेर्यांनी सजलेले स्मार्टफोन लॉन्च होणार आहेत. फ्लॅगशिप सेगमेंटपासून मध्यम बजेट रेंजपर्यंत विविध श्रेणीतील हाय-परफॉर्मन्स मॉडेल्स बाजारात दाखल होण्याची तयारी सुरू आहे. 5G क्षमता, फास्ट चार्जिंग, AI-आधारित फीचर्स, उच्च रिफ्रेश रेटचे डिस्प्ले आणि विशेष कॅमेरा इनोव्हेशन्स यामुळे ग्राहकांची पसंती मिळवण्यासाठी मोठी स्पर्धा पाहायला मिळणार आहे. त्यामुळे स्मार्टफोन अपग्रेड करण्याचा विचार करत असाल, तर नोव्हेंबर महिना तुमच्यासाठी सर्वात योग्य ठरणार आहे.
OnePlus 15 हा स्मार्टफोन भारतात 13 नोव्हेंबर रोजी लाँच होणार आहे. हा फोन चीनमध्ये आधीच आला आहे. OnePlus 15 मध्ये नवीनतम आणि वेगवान क्वालकॉम चिपसेट - स्नॅपड्रॅगन 8 एलिट जेन 5 आहे. OnePlus 13 हा कंपनीचा पहिला फोन आहे ज्यामध्ये 165 Hz रिफ्रेश रेट डिस्प्ले आहे. फोनमध्ये 50-मेगापिक्सेलचा ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप असेल.
iQOO 15 हा स्मार्टफोन भारतात 26 नोव्हेंबर रोजी लाँच होणार आहे. हा स्मार्टफोन आधीच चीनमध्ये आला आहे. iQOO 15 मध्ये स्नॅपड्रॅगन 8 एलिट जेन 5 चिपसेट असेल. यात एक Q3 गेमिंग चिप देखील असेल, जी गेमर्सना चांगला अनुभव देईल. iQOO 15 हा Android 16 वर आधारित OriginOS 6 वर चालेल. उल्लेखनीय म्हणजे, हा भारतातील iQOO चा पहिला स्मार्टफोन असेल ज्यामध्ये Funtouch OS ऐवजी OriginOS असेल. फोन ब्लॅक आणि सिल्व्हर रंगामध्ये खरेदीसाठी उपलब्ध असेल.
ओप्पोची प्रीमियम ओप्पो फाइंड एक्स९ सीरीज चीनमध्ये लाँच करण्यात आली आहे आणि आता ती भारतात आणण्याची तयारी करत आहे. कंपनी दोन मॉडेल्स लाँच करणार आहे - फाइंड एक्स९ आणि फाइंड एक्स९ प्रो. दोन्ही फोन मीडियाटेकच्या डायमेन्सिटी 9500 चा प्रोसेसर असेल आणि अँड्रॉइड 16 वर बेस्ड कलरओएस 16 वर चालतील. फाइंड एक्स९ सीरीजमध्ये एआय कॅमेरासह हॅसलब्लेडसोबतच्या पार्टनरशिपमध्ये तयार करण्यात आले आहे.
Realme GT 8 Pro स्मार्टफोन सध्या चर्चेत आहे. तो नोव्हेंबरमध्ये लाँच होणार आहे. हा Realme चा पहिला स्मार्टफोन आहे ज्यामध्ये Ricoh GR Optics सोबत भागीदारीत विकसित केलेली कॅमेरा सिस्टम आहे. Realme GT 8 Pro मध्ये Snapdragon 8 Elite Gen 5 चिपसेट देखील असेल. यात 144Hz रिफ्रेश रेटसह 6.79-इंचाचा QHD+ डिस्प्ले असेल. फोनमध्ये 7,000mAh बॅटरी असेल. हा फोन फ्लिपकार्ट आणि कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर विक्रीसाठी उपलब्ध असेल.
देशांतर्गत कंपनी लावा देखील आपला नवीन स्मार्टफोन, लावा अग्नि ४ लाँच करणार आहे. त्याची लाँचिंग तारीख २० नोव्हेंबर रोजी निश्चित करण्यात आली आहे. नवीन लावा स्मार्टफोन २५ हजार रुपयांच्या किमतीत लाँच केला जाईल. लावा अग्नि ३ च्या तुलनेत, यात ड्युअल रियर कॅमेरा सेटअप असेल. यावेळी फोनमध्ये ड्युअल स्क्रीन नसेल. कंपनीने बिल्डवर काम केले आहे. लावा अग्नि ४ मध्ये मेटल फ्रेम असेल. फोनमध्ये ७ हजार एमएएचची मोठी बॅटरी असू शकते. काही रिपोर्ट्सनुसार बॅटरी ५ हजार एमएएचची असल्याचे म्हटले आहे.