Flipkart Republic Day Sale 2026 : प्रसिद्ध ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने 'रिपब्लिक डे सेल 2026' नावाने सेल सुरू केला आहे. या सेलमध्ये अनेक प्रोडक्ट्सवर मोठ्या ऑफर्स दिल्या जात आहेत. चला तर मग, या सेलमध्ये उपलब्ध असलेल्या एका बेस्ट डीलविषयी जाणून घेऊ.
फ्लिपकार्ट रिपब्लिक डे सेल 2026 मध्ये स्मार्टफोन्सवर मोठ्या ऑफर्स उपलब्ध झाल्या आहेत. या सेलमध्ये Moto G86 Power 5G मॉडेल खास आकर्षण ठरत आहे. मोठी बॅटरी, मजबूत बिल्ड आणि हाय-एंड कॅमेरा फीचर्ससह हा फोन १५ हजार रुपयांच्या रेंजमध्ये मिळत आहे.
25
डिस्काउंटनंतर कितीला मिळणार?
Moto G86 Power 5G फोन लाँच झाला तेव्हा त्याची किंमत १७,९९९ रुपये होती. सध्या फ्लिपकार्टवर तो १६,९९९ रुपयांना मिळत आहे. याशिवाय, HDFC बँक क्रेडिट कार्डवर १०% डिस्काउंट मिळवू शकता. यामुळे सुमारे १,७०० रुपयांची सूट मिळेल. परिणामी, हा फोन जवळपास १५ हजारांत खरेदी करता येईल. गोल्डन सायप्रस, कॉस्मिक स्काय आणि स्पेल बाउंड कलर ऑप्शन्स आहेत.
35
सुपर AMOLED डिस्प्ले हे खास वैशिष्ट्य
या स्मार्टफोनमध्ये ६.७ इंचाचा सुपर HD AMOLED डिस्प्ले आहे. 120Hz रिफ्रेश रेटमुळे स्क्रोलिंग खूप स्मूथ होते. यात कमाल ४५०० निट्स ब्राइटनेस मिळतो. कॉर्निंग गोरिला ग्लास 7i चे संरक्षण आहे. HDR10+ सपोर्ट आणि लो ब्लू लाइट SGS सर्टिफिकेशनसुद्धा आहे.
Moto G86 Power 5G फोनला MIL-STD-810H मिलिटरी ग्रेड सर्टिफिकेशन मिळाले आहे. IP68 आणि IP69 रेटिंगसह तो डस्ट आणि वॉटर रेझिस्टंट आहे. कामगिरीसाठी मीडियाटेक डायमेन्सिटी 7400 SoC चिपसेट वापरला आहे. हा फोन Android 15 वर आधारित Hello UI वर चालतो.
55
कॅमेरा आणि बॅटरी फीचर्स
फोटोग्राफीसाठी यात 50MP Sony LYT-600 प्रायमरी कॅमेरा आहे. सोबत 8MP अल्ट्रावाइड कॅमेरा आणि 3-in-1 फ्लिकर लेन्स आहे. सेल्फीसाठी 32MP फ्रंट कॅमेरा दिला आहे. 6720mAh ची मोठी बॅटरी हे या फोनचे मुख्य वैशिष्ट्य आहे. 33W TurboPower फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे. 5G, 4G LTE, Wi-Fi 6, Bluetooth 5.4, USB Type-C पोर्ट मिळतात. ड्युअल स्टीरिओ स्पीकर, Dolby Atmos आणि Hi-Res ऑडिओ सपोर्टही आहे. सुरक्षेसाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर दिला आहे.