वेळ मिळाला की तुम्ही फोन चार्जिंगला लावता का? पण एकदा फोन चार्ज करायला किती खर्च येतो, याचा कधी विचार केलाय? हा हिशोब पाहिलात तर तुम्ही नक्कीच थक्क व्हाल.
मोबाईलशिवाय आपण एक मिनिटही राहू शकत नाही. कुठेही गेलो तरी चार्जर सोबत असतोच. पण एकदा फोन चार्ज करायला किती खर्च येतो, याचा कधी विचार केलाय? साधारण चार्जर ५ ते २० वॅट्सचा असतो. ५ वॅटचा चार्जर फोन हळू चार्ज करतो, तर २० वॅटचा चार्जर वेगाने चार्ज करतो.
समजा तुम्ही १० वॅटचा चार्जर वापरताय. फोन चार्ज व्हायला २ तास लागतात. म्हणजे १० वॅट्स X २ तास = २० वॅट-अवर. म्हणजेच ०.०२ युनिट करंट खर्च होतो. रोज एकदा फोन चार्ज केला तर ०.०२ युनिट वीज लागते. या हिशोबाने वर्षाला एकूण ०.०२ × ३६५ = ७.३० युनिट करंट खर्च होतो.
24
वर्षाला किती रुपये लागतात?
एका युनिटचा दर १० रुपये पकडला, तर वर्षाला फोन चार्ज करण्यासाठी ७३ रुपये खर्च येतो. जर तुम्ही २० वॅटचा चार्जर वापरत असाल, तर वर्षाला साधारण ७३ × २ = १४६ रुपये खर्च येईल. फोन १००% चार्ज झाल्यावर चार्जर प्लगमधून काढून ठेवा. तसाच ठेवला तर विनाकारण करंट खर्च होतो. शिवाय वायर खराब असेल तर अपघातही होऊ शकतो.
34
१००% चार्ज झाल्यावरही वीज जाते
अनेकांना रात्रभर फोन चार्जिंगला लावून झोपायची सवय असते. पण फोन १००% चार्ज झाल्यावरही प्लग चालू असेल, तर 'ट्रिकल चार्जिंग' मुळे फोन थोडी थोडी वीज ओढत राहतो. यामुळे वीज तर वाया जातेच, पण बॅटरी गरम होऊन तिचे आयुष्यही कमी होते. बॅटरी चांगली टिकवायची असेल, तर चार्जिंग नेहमी २०% ते ८०% च्या दरम्यान ठेवा.
स्मार्टफोनमध्ये लिथियम-आयन (Lithium-ion) बॅटरी असते, जी जास्त उष्णतेमुळे लवकर खराब होते. त्यामुळे फोन चार्ज होत असताना गेम खेळणे किंवा व्हिडिओ बघणे टाळा. तसेच, स्वस्त आणि बनावट चार्जर वापरल्याने शॉक लागण्याचा किंवा फोनचा स्फोट होण्याचा धोका असतो. नेहमी कंपनीचेच ओरिजिनल चार्जर वापरा.
वीज वाचवण्यासोबतच बॅटरी सुरक्षित ठेवण्याचे काही सोपे उपाय आहेत. फोन चार्जिंगला लावताना त्याचा बॅक कव्हर काढून ठेवणे चांगले. कारण चार्जिंग करताना तयार होणारी उष्णता कव्हरमुळे बाहेर पडू शकली नाही, तर बॅटरीची क्षमता कमी होते.
तसेच, फोन चार्ज करताना "एरोप्लेन मोड" ऑन ठेवला, तर बॅकग्राउंडला चालणारे नेटवर्क ॲप्स बंद होतात. यामुळे फोन कमी वीज वापरून वेगाने चार्ज होतो. कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपच्या USB पोर्टवरून फोन चार्ज करण्यापेक्षा, थेट भिंतीवरच्या सॉकेटमध्ये चार्जर लावून फोन चार्ज करणे बॅटरीसाठी जास्त सुरक्षित असते.
Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .