मुंबई : आजकाल प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहे. पण तुमच्या फोनमध्ये असे काही जादुई आणि कमाल फीचर्स आहेत जे तुम्हाला माहितीही नसतील… या फीचर्सबद्दल जाणून घेतल्यावर तुम्ही आश्चर्यचकीत व्हाल. चला तर मग अशाच ६ गुप्त फीचर्सबद्दल जाणून घेऊया…
Samsung, Xiaomi, Realme, Vivo सारख्या फोनमध्ये 'अॅप लॉक' सेटिंग्जमध्येच असतो. सेटिंग्ज > सिक्युरिटी > अॅप लॉक मध्ये जाऊन WhatsApp, गॅलरी सारखे अॅप्स लॉक करा. यामुळे तुमची प्रायव्हसी वाढेल, कोणीही तुमचे फोटो, चॅट किंवा बँकिंग अॅप उघडू शकणार नाहीत.
26
2. व्हॉल्यूम बटणच्या मदतीने कॉल रेकॉर्ड
काही अँड्रॉइड फोन जसे की MiUI, ColorOS, OneUI मध्ये पॉवरफुल कॉल रेकॉर्डिंग फीचर असतात. कॉल सुरु असताना व्हॉल्यूम + दाबून रेकॉर्डिंग सुरू करता येते. हे फीचर प्रत्येक फोनमध्ये नसते. भारतात कॉल रेकॉर्डिंग कायदेशीर नाही. त्यामुळे हे फिचर जपून वापरा.
36
3. मोबाईल सांगेल, कोण कॉल करत आहे
या फीचरमध्ये जेव्हा कॉल येईल तेव्हा फोन सांगेल - 'Calling from... XYZ'. हे सुरू करण्यासाठी सेटिंग्ज > अॅक्सेसिबिलिटी > अनाउन्स कॉलर आयडी किंवा फोन अॅप > सेटिंग्ज > कॉलर आयडी अनाउन्समेंट फॉलो करा. ड्रायव्हिंग करताना हे खूप उपयुक्त फीचर आहे. तसेच, ज्येष्ठ नागरिकांसाठीही खूप आवश्यक आणि कामाचे आहे.
जवळपास प्रत्येक ब्रँडमध्ये हे गुप्त फीचर मिळते. हे सुरू करण्यासाठी सेटिंग्जमध्ये जाऊन बॅटरी > अल्ट्रा/एक्सट्रीम बॅटरी सेव्हर किंवा बॅटरी मोड्समध्ये जा. यामुळे सर्व बॅकग्राउंड अॅप्स बंद होतात. स्क्रीन ब्राइटनेस कमी होते. फक्त कॉल-मेसेज चालू राहतात.
56
5. वन हॅन्ड मोड
मोठ्या फोनमुळे त्रास होत असेल तर हे फीचर खूप उपयुक्त ठरेल. यामुळे संपूर्ण स्क्रीन खाली सरकेल. तुम्ही एकाच अंगठ्याने सर्व कंट्रोल करू शकाल. हे सुरू करण्यासाठी सेटिंग्ज > अॅडव्हान्स फीचर्स > वन हँड मोड फॉलो करा. विशेषतः महिला आणि वृद्धांसाठी हे फीचर वरदान आहे.
66
6. हिडन कॅच क्लिनर
जर तुमचा फोन स्लो चालत असेल किंवा अॅप्स वारंवार क्रॅश होत असतील तर एका क्लिकने या सर्व समस्या दूर होतील. यासाठी सेटिंग्जमध्ये जाऊन स्टोरेज > कॅश्ड डेटा > क्लिअर ऑल किंवा सेटिंग्ज > बॅटरी आणि डिवाइस केअर (सॅमसंगमध्ये) > ऑप्टिमाइज नाउ फॉलो करा.