म्युच्युअल फंडातून बक्कळ पैसा कमवण्यासाठी तुमच्याकडे लाखो रुपये असण्याची गरज नाही. तुम्ही दरमहा फक्त 2,000 रुपयांची छोटी गुंतवणूक करूनही करोडपती होऊ शकता, असे आर्थिक तज्ज्ञ सांगतात.
आजकाल सामान्य लोकांमध्ये म्युच्युअल फंडातील सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) खूप लोकप्रिय झाला आहे. छोट्या बचतीतूनही माणूस करोडपती होऊ शकतो, हे आपण अनेकदा ऐकतो. अशा वेळी, तुम्ही दरमहा फक्त 2,000 रुपये गुंतवले, तर तुमच्या खात्यात 1 कोटींचा फंड कसा तयार होईल ते आपण पाहूया. पण या प्रवासात एक मोठा ट्विस्ट आहे, जो प्रत्येक गुंतवणूकदाराने समजून घेतला पाहिजे.
25
कंपाउंडिंगची जादू कशी काम करते माहितीये?
म्युच्युअल फंडात खरी जादू कंपाउंडिंगची असते. तुम्ही जेव्हा दीर्घकाळासाठी पैसे गुंतवता, तेव्हा तुमचा पैसा वेगाने वाढतो. तुम्ही नियमितपणे गुंतवणूक केली, तर चक्रवाढ व्याजाच्या फायद्यामुळे तुमची छोटी रक्कमही पुढे जाऊन एका मोठ्या फंडात बदलते.
35
12 टक्के वार्षिक परतावा मिळाला तर काय होईल?
तुमच्या गुंतवणुकीवर वर्षाला अंदाजे 12 टक्के परतावा मिळाला, तर गणित कसे असेल ते पाहूया.
तुमच्या गुंतवणुकीवर वर्षाला 15 टक्के परतावा मिळाला, तर तुमचा वेळ खूप वाचेल.
• दरमहा गुंतवणूक: 2,000 रुपये
• अंदाजित वार्षिक परतावा: 15%
• गुंतवणुकीचा कालावधी: 27 वर्षे
• तुमची एकूण गुंतवणूक: 6,48,000 रुपये (सुमारे 6.4 लाख)
• तयार होणारा अंदाजित फंड: 1.05 कोटी रुपये
तुम्ही 15 टक्के परतावा मिळवला, तर अवघ्या 27 वर्षांत तुम्ही 1 कोटींचे लक्ष्य गाठाल. तेच 12 टक्के परताव्याच्या हिशोबाने तुम्हाला 33 वर्षे लागतील.
55
स्टेप-अप SIP द्वारे करा स्मार्ट गुंतवणूक
वेळेसोबत तुमचा पगार आणि उत्पन्न वाढते, तशी तुम्ही तुमची SIP रक्कमही दरवर्षी वाढवली पाहिजे. यालाच स्टेप-अप SIP म्हणतात. उदाहरणार्थ, तुम्ही 2,000 रुपयांपासून गुंतवणूक सुरू केली आणि दरवर्षी तुमची SIP फक्त 10 टक्क्यांनी वाढवली, तर 12 टक्के परताव्याच्या हिशोबाने 33 वर्षे लागणारे काम तुम्ही अवघ्या 24 वर्षांत पूर्ण कराल आणि 1 कोटींचा टप्पा ओलांडाल.
Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .