गुंतवणुकीसाठी सुरक्षित पर्याय शोधत असाल, तर एक अशी योजना आहे ज्यात अल्पवयीनपासून ते निवृत्तीनंतरही गुंतवणुकदार गुंतवणूक करू शकतो. या योजनेत पैसे सुरक्षित राहण्यासह चांगला व्याजदरही मिळतो. शिवाय दर महिन्याला या योजनेतून कमाईदेखील होऊ शकते.
सुरक्षित गुंतवणुकीची ही योजना झिरो रिस्क गुंतवणूक योजना आहे. यात गुंतवणूक केल्यानंतर त्याच्या सुरक्षिततेची हमी सरकारकडून दिली जाते.
26
गुंतवणुकीवर टॅक्स बेनिफिट
या योजनेत कमीत कमी १००० रुपयांपासून गुंतवणूक करता येते. ३० लाखांपर्यंत सर्वाधिक गुंतवणूक करता येते. या गुंतवणुकीवर टॅक्स बेनिफिटदेखील मिळतं. या योजनेत गुंतवणूक केल्यानंतर वर्षाला १.५ लाख रुपयांपर्यंतची टॅक्स सूट मिळू शकते.
36
दर महिन्याला मिळतील १७ हजार
ही योजना आहे पोस्ट ऑफिसची सीनिअर सिटीजन सेव्हिंग स्कीम. ही योजना सुरक्षित, चांगल्या रिटर्न्सच्या गुंतवणुकीसाठी फायद्याची ठरते. या स्किममध्ये गुंतवणूक केल्यानंतर दर महिन्याला १७ हजार रुपये किंवा त्याहून अधिकची कमाई देखील होते.
या योजनेसाठी पाच वर्षांची मुदत ठेवण्यात आली आहे. संपूर्ण पाच वर्ष गुंतवणूक केल्यानंतर या योजनेतील फायदे मिळतात.
56
गुंतवणूक बंद केल्यास दंड
या सरकारी योजनेतील गुंतवणुकीवर दर ३ महिन्यांनी व्याज देण्याची तरतूद आहे. जर गुंतवणूकदाराने ५ वर्षांचा कालावधी पूर्ण केला नाही, म्हणजेच पाच वर्ष पूर्ण होण्याआधी गुंतवणूक बंद केली तर त्याचं नुकसान होतं. नियमांनुसार गुंतवणूकदाराला दंड भरावा लागतो.
66
१७ हजार दर महिन्याला कसे मिळतील?
या योजनेत १५ लाख एकरकमी गुंतवता येतात. शिवाय जॉईंट अकाऊंटद्वारे ३० लाख गुंतवू शकता. दर महिन्याला १७ हजार मिळण्यासाठी २५ लाख रुपये गुंतवावे लागतील. या गुंतवणुकीनंतर तीन महिन्याला ५१,२५० रुपये मिळतील. ही रक्कम ५ वर्षांपर्यंत मिळेल.