SBI ग्राहकांसाठी मोठी बातमी! ४ तारखेला 'या' वेळेत UPI संदर्भात व्यवहार होणार नाहीत

Published : Sep 03, 2026, 09:18 AM IST
UPI Payment

सार

SBI ने आपल्या ग्राहकांना सावध केलं आहे. ४ सप्टेंबर रोजी एका विशिष्ट वेळेत UPI सेवा बंद राहणार आहे. त्यामुळे व्यवहार केल्यास तुमचे पैसे अडकू शकतात. जाणून घ्या नेमकी वेळ कोणती आहे.

मुंबई : देशातील सर्वात मोठी सरकारी बँक, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) करोडो ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. तुम्हीही चहाच्या टपरीपासून ते रोजच्या खरेदीपर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी UPI ने ऑनलाईन पेमेंट करत असाल, तर ४ सप्टेंबरला तुम्हाला थोडं सावध राहावं लागेल. SBI ने आपल्या ग्राहकांना माहिती दिली आहे की, मेंटेनन्सच्या कामामुळे ४ सप्टेंबर रोजी काही वेळेसाठी UPI सेवा बंद राहील.

स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, ४ सप्टेंबर २०२६ रोजी मध्यरात्री ००:१५ ते ०१:०० वाजेपर्यंत (IST) म्हणजे एकूण ४५ मिनिटांसाठी SBI ची UPI सेवा तात्पुरती बंद असेल. बँकेने सांगितलं की हे एक नियमित मेंटेनन्सचं काम आहे, जे वेळेपूर्वीही पूर्ण होऊ शकतं. पण, या ४५ मिनिटांच्या काळात Google Pay, PhonePe, PayTM किंवा YONO ॲपवरून SBI खात्यातून कोणताही UPI पेमेंट करताना अडचण येऊ शकते. या त्रासाबद्दल बँकेने ग्राहकांची माफी मागितली आहे.

त्रास टाळण्यासाठी 'UPI Lite' वापरू शकता. SBI ने आपल्या ग्राहकांना सल्ला दिला आहे की, या डाउनटाइममध्येही विनाअडथळा डिजिटल व्यवहार सुरू ठेवण्यासाठी ते UPI Lite सेवेचा वापर करू शकतात. UPI Lite द्वारे छोटे व्यवहार सहज करता येतात. UPI Lite च्या माध्यमातून UPI पिनशिवाय १००० रुपयांपर्यंतचे छोटे व्यवहार सहज करता येतात. यामध्ये वॉलेट बॅलन्सची कमाल मर्यादा ५००० रुपये ठेवण्यात आली आहे.

SBI UPI व्यवहारांची दैनिक मर्यादा

बँकेने ग्राहकांसाठी UPI व्यवहारांचे नियम आणि दैनिक मर्यादा देखील ठरवून दिली आहे:

P2P (एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला) व्यवहार: एका दिवसात जास्तीत जास्त २० व्यवहार.

एकूण दैनिक मर्यादा: एका दिवसात जास्तीत जास्त १,००,००० रुपयांचे व्यवहार करता येतात.

विशेष मर्चंट मर्यादा: विमा आणि भांडवली बाजारासाठी (Capital Markets) २,००,००० रुपये आणि IPO, टॅक्स पेमेंट, हॉस्पिटल आणि शैक्षणिक संस्थांसाठी ही मर्यादा ५,००,००० रुपयांपर्यंत आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

जन्माष्टमीला लाडू गोपाळाला द्या राजेशाही लूक; 'कान्हा'साठी ट्राय करा हे सुंदर पोशाख डिझाइन्स
हलक्या साडीवर 1 ग्रॅमचे गोल्ड टॉप्स दिसतील एकदम रॉयल